पांढरकवडात पुन्हा २३ जण पॉझिटिव्ह

पांढरकवडात पुन्हा २३ जण पॉझिटिव्ह

ठळक मुद्देकोरोनाचा उद्रेक सुरूच : रुग्णांची संख्या पोहचली १९६ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून रविवारी सायंकाळी पुन्हा शहरातील २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १९६ वर पोहचली आहे.
दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्यांना सुट्टी देण्यात येत आहे. पांढरकवडा शहरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.
पांढरकवडा शहरात आतापर्यंत सहा प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये येथील शास्त्री वार्ड, हनुमान वार्ड, मेन रोड, महादेवनगर, आदर्श कॉलनी, मस्जिद वार्डचा समावेश आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या ट्रामा केअर इमारतमधील कोविड सेंटर, चिंतामणीनगरमधील वनभवन तसेच परिसरातील मुलांच्या वसतिगृहात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत आहे, याच ठिकाणी वेगळा विभाग निर्माण करून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार केले जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असुन उपाय योजनांवर भर दिला जात आहे.

Web Title: In Pandharkavad, 23 people are positive again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.