शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा नगरपरिषदेचे संख्याबळ १७ वरून १९

By admin | Updated: January 17, 2015 23:07 IST

नगरपरिषदेच्या वाढलेल्या हद्दीतून दोन नगरसेवक निवडून देण्याकरिता लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूकपूर्व

प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडानगरपरिषदेच्या वाढलेल्या हद्दीतून दोन नगरसेवक निवडून देण्याकरिता लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूकपूर्व काही बदलांचे वारेसुद्धा नगरपरिषदेत वाहू लागले आहे.पांढरकवडा नगरपरिषदेची हद्द वाढ झाल्याने येथील १७ सदस्यीय सभागृहात आता दोन सदस्य वाढून १९ सदस्य होणार आहेत. नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्याने दोन सदस्यांकरिता लवकरच निवडणूक होणार आहे. वाढीव क्षेत्रातून दोन नगरसेवक निवडून देण्याकरिता चार सदस्य असलेल्या प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये एक सदस्य वाढविण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी आरक्षण काढून निवडणूक होणार आहे.सध्या येथील नगरपरिषदेत काँग्रेस व पारवेकर गटाची सत्ता आहे. सद्यस्थितीत नगरपरिषदेत १७ सदस्य संख्या आहे. त्यात काँग्रेस १३, पारवेकर गट दोन, तिवारी गट चार असे बलाबल आहेत. नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस व पारवेकर गटाने युती करून लढविली होती. त्यांना स्पष्ट बहुमत प्राप्त होऊन १७ पैकी १३ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर नगराध्यक्षपदी शंकर बडे दोन वर्षांपूर्वी विराजमान झाले. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपणार आहे. त्यानंतर अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेकरिता राखीव आहे.दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणूक कार्यकाळात तालुक्यातील राजकारणात मोठे बदल झाले. अनेक दिग्गजांनी भाजपसोबत जाणे पसंत केल्याने तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे आता दोन नगरसेवक जरी निवडून द्यायचे असले, तरी सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक प्रतिष्ठेची करणार असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीपूर्वी काही नगरसेवक ‘चेंज’च्या मूडमध्ये दिसत आहे. त्यांनी आपल्या पद्धतीने वरिष्ठांकडे ‘लॉबिंग’ केल्याची चर्चा आहे. वरिष्ठ नेते मंडळी या ‘लॉबींग’ला किती महत्त्व देतात, हे येणारा काळच सांगणार आहे. एकूणच पुन्हा येथील नगरपरिषदेमध्ये राजकीय हालचाली दिसणार आहे, एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)