तालुक्यातील शिवर-भंडारी येथील पायल ठवकर हिला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग अवरूद्ध झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला अन त्यातून तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला. ...
आपल्या विविध मागण्यांना घेऊन ‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील बसस्थानक चौकातील पुतळ्याला हारार्पण करून मोर्चाद्वारे पेंशनधारक तिरंगा चौकात पोहोचले. ...
आठ नऊचा पाणा... हे नटबोल्ट टाईट करण्याचे औजार नव्हे म्हटले तर तुम्हाला खरे वाटणार नाही. पण होय, यवतमाळात ‘आठ नऊचा पाणा’ हे एका गुन्हेगाराचे नाव आहे. तसाच ‘संडास’ या काहिशा उपेक्षित शब्दाला एका गुन्हेगाराने स्वत:चे नाव म्हणून धारण केला आहे. ...
गरिबी जन्माचीच वैरणी. परिणामी जीवनात दु:खाचे अडथळे कायम. मात्र नियतीच्या परीक्षेत कधी पास-नापास होताना केवळ जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर येथील चहा टप्परीवाल्याच्या मुलाने नीटमध्ये यश प्राप्त केले. आता गरिबीमुळे त्याच्यासमोर एमबीबीएस प्रवेशाचे खडत ...
गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे. ...
पुसद शहरातील भीमा हाटे मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला जावा, अशी शिफारस राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे. त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. ...
चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात, शेकडो पुरूष व महिलांनी मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांची भेट घेऊन आपली भावना व्यक्त केली. ...
महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील अंतर्गत धुसफूसीचे लोण नेरपर्यंत पोहोचले आहे. तालुक्यात एकीने राहिलेल्या शिवसेनेला आता गटातटाची वाळवी लागली आहे. प्रामुख्याने संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी भावना गवळी यांच ...