साडेचार वर्षे सत्तेत राहून टोकाचा विरोध केल्यानंतरही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेने एकत्र येत युती केली. युतीचा हाच पॅटर्न आता सत्तेसाठी येथे जिल्हा परिषदेत राबविला जाणार का? याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. ...
स्थानिक रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री तब्बल ३ लाख ६१ हजारांची चोरी झाली होती. तिकीट काऊंटरवरची तिजोरी उघडून रोख लंपास केली. या गुन्ह्यात रेल्वेतील लिपिकेचाच पती आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. टोळीविरोधी पथकाने चोरट्या पतीला शुक्रवारी अटक केली ...
ग्रामीण भागातील महिलांपुढे आजही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्याने उपजीविकेत अडचणी येतात. तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते. ...
शिवशाहीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण होते. मात्र स्वातंत्र्यानंतर कोणतेही सण साजरे करतो म्हटले की पोलीस बंदोबस्त लागतोच. ज्या दिवशी पोलीस बंदोबस्ताशिवाय सण साजरे होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवशाही नांदेल, असे प्रतिपादन आमदार ख्वाजा बेग यांनी केले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना चार ते सहा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या मागे आगामी उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत असे सोज्वळ कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुढे केले जात ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...