शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरील कीड नियंत्रणाबाहेर

By admin | Updated: September 29, 2014 00:52 IST

वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे

महागाव : वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेतात. मात्र त्यांचेही मार्गदर्शन कुचकामी ठरत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी अफलातून प्रयोग सुरू केला असून चक्क दारू फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे.यावर्षी जिल्ह्यात खरिपाची स्थिती सुरुवातीपासून नाजूक आहे. पेरणी केली तेव्हा पावसाचा पत्ता नव्हता. त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले. मात्र तळपत्या उन्हाने अंकुरलेले बियाणे वाळून गेले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. यावरही मात करीत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निसर्ग साथ द्यायला तयार नव्हता. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. पिकांना नवसंजीवनी मिळाली. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस सारखा पाऊस कोसळत होता. यानंतर पावसाने दडी मारली ती आजतागायत. अशा स्थितीत पिकांवर किडींनी आक्रमण केले आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी आदींनी कपाशीला घेरले आहे. तर मोझॅक आणि इतर रोगांनी सोयाबीन उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. अशा स्थितीत शेतकरी परंपरागत ज्ञानावर आधारित किटकनाशके फवारून कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात यश येत नाही. शेवटी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. कृषी विभागाने यावर उपाय सुचविले. मात्र तेही उपाय कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आता अफलातून प्रयोग केल्याचे महागाव तालुक्यात दिसत आहे. पिकांना चक्क देशी दारूची फवारणी करीत आहे. या फवारणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र शेतकरी अनुभवातून ही फवारणी करीत आहे. यंदाच हा प्रयोग शेतकरी करीत आहे, असे नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी याचा प्रयोग करीत आहे. कोणत्याही किडीवर दारू फवारणी हा काही उपाय होवू शकत नाही, असे शेतकऱ्यांना कृषी विभागाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी शेतकरी तुम्हीच योग्य मार्गदर्शन करा, असे उलट त्यांना विचारत आहे. यामुळे आता कृषी विभागाचे अधिकारीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत पडत नाही. तालुक्यात सध्या पिकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सोयाबीनची शेती पिवळी पडली आहे. पऱ्हाटीवर लाल्या आणि इतर रोग दिसत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. शेकडो शेतकरी हवालदिल झाले आहे. (शहर प्रतिनिधी)