शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत; अपघातात वडील व मुलगी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 21:32 IST

विनोद दत्ताराव पाटील (४५) आणि शुभांगी विनोद पाटील (१८) अशी मृतांची नावे असून ते वालतूर येथील रहिवासी आहेत.

पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील वालतूर (रेल्वे) येथे व्हीस्टा वाहन विहिरीत पडून वडील व मुलगी जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. विनोद दत्ताराव पाटील (४५) आणि शुभांगी विनोद पाटील (१८) अशी मृतांची नावे असून ते वालतूर येथील रहिवासी आहेत. या दोघांसह विनोद यांची पत्नी विद्या असे तिघेजण सोमवारी व्हीस्टा कारने (क्र. एमएच २९-एडी २०५५) शेतात जात होते.परत येत असताना गावानजीक विनोद यांनी पत्नी विद्या यांना वाहनातून उतरून देऊन वाहन वळवितो असे सांगितले. मात्र त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांचे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका कच्च्या विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याने पूर्णपणे भरलेली होती. या अपघातात मुलगी व वडील जागीच ठार झाले. विद्या यांनी आरडाओरड केली असता गावकरी गोळा झाले. त्यांनी वसंतनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत विनोद व शुभांगी या दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मंगळवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे. मृत विनोद पाटील यांना चारही मुली आहे. चारही मुली अविवाहित आहे. त्यांची मोठी मुलगी विशाखा गावची सरपंच आहे. मृतक शुभांगी ही दुस-या क्रमांकाची मुलगी होती. तिच्यापेक्षा अर्पिता व स्वरा या दोन लहान भगिनी आहे.  या घटनेने वालतूर (रेल्वे) येथे शोककळा पसरली.