शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या बदल्या पारदर्शकच झाल्या

By admin | Updated: June 1, 2016 00:21 IST

१० वर्षापूर्वीच्या कृती समितीच्या लेटरपॅडचा गैरवापर करीत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलीवर स्थगिती आणली.

जिल्हाधिकाऱ्यांपुढे व्यथा : ६३३ शिक्षक आयुक्त कार्यालयावर धडकणारयवतमाळ : १० वर्षापूर्वीच्या कृती समितीच्या लेटरपॅडचा गैरवापर करीत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलीवर स्थगिती आणली. पदाधिकाऱ्यांना यात काहीच साधता आले नाही. सर्व शिक्षकांना वेठीस धरून प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात आली. यामुळे बदलीस पात्र शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, अशी मागणी करीत शिक्षकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही आपबिती सांगितली. ६३३ शिक्षक बुधवारी आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. शिक्षकांच्या बदली प्रकरणात कृती समितीने गैरप्रकार झाल्याची तक्रार केली. यामुळे शासनाच्या अवर सचिवानी बदल्यांना स्थगिती देत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सोमवारी जिल्हा परिषदेत हे पत्र धडकले होते. यामुळे चांगलेच वादळ उठले. मंगळवारी बदल्यांच्या स्थगिती प्रकरणात शिक्षकांनी कृती समिती विरूद्ध रणशिंग फुंकले. कृती समितीमधील नेत्यांना बदलीमध्ये स्वार्थ साधता आला नाही. यामुळे पारदर्शक बदली प्रक्रिया स्थगितीचे कारस्थान रचल्याचा आरोप शिक्षकांनी केला. व्हिडीओ चित्रीकरण, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया झाली. ३२ वर्षांपासून तालुका न बदल झालेल्या शिक्षकांना तालुका बदलून मिळाला होता. बदलीस पात्र शिक्षकांपुढे पर्याय ठेवण्यात आले होते. या बदलीमध्ये नेत्यांच्या जागा अडचणीत आल्या आहेत. शिक्षकांना न्याय मिळाला आहे. स्थगिती आणणे हा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप बदलीस पात्र शिक्षकांनी केला.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे शिक्षकांनी आपबिती मांडली. कृती समिती १० वर्ष जुनी आहे. यामध्ये एकाच शाळेतील तीन शिक्षक पदाधिकारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणात ६३३ शिक्षक बुधवारी अमरावती आयुक्तापुढे आपली तक्रार मांडणार आहे. याविषयाचे निवेदन सादर करताना दिवाकर राऊत, सचिन शिंदे, आसाराम चव्हाण, प्रकाश सरताबे, सुहास लांबाडे, बादल धाबर्डे, निलेश श्रृंगारे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. (शहर वार्ताहर)