अनुदानित बियाणांची खुल्या बाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:26+5:30

यातून १८ ते २० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप उंबरकर यांनी तक्रारीतून केला आहे. महाराष्ट्र शासनाने गरिब व सामान्य शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी अनुदानावर अल्प दराने बियाणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. परंतु कृषी विभागातील व महाबिज मंडळातील अधिकाºयांनी कृषी केंद्र चालकांना हाताशी धरून बियाणांवरील अनुदान लाटत सदर बियाणे खुल्या बाजारात विकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे.

Open market sales of subsidized seeds | अनुदानित बियाणांची खुल्या बाजारात विक्री

अनुदानित बियाणांची खुल्या बाजारात विक्री

Next
ठळक मुद्देकोट्यवधींचा घोटाळा : मनसेने केली जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी मंत्र्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शोषण अद्यापही थांबलेले नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणारे चणा बियाणे चक्क खुल्या बाजारात विकण्यात आल्याची गंभीर तक्रार मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकाºयांसह थेट कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
यातून १८ ते २० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप उंबरकर यांनी तक्रारीतून केला आहे. महाराष्ट्र शासनाने गरिब व सामान्य शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी अनुदानावर अल्प दराने बियाणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. परंतु कृषी विभागातील व महाबिज मंडळातील अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकांना हाताशी धरून बियाणांवरील अनुदान लाटत सदर बियाणे खुल्या बाजारात विकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे. महाबिज मंडळाकडून सन २०१९ च्या रबी हंगामासाठी यवतमाळ जिल्ह्याकरिता २८ हजार क्विंटल चणा बियाणे देण्यात आले होते. यातील १८ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्याचे आदेश होते. हे बियाणे वाटप करण्याआधी या योजनेची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी आपापल्या तालुक्यातील वितरकांची यादी प्रसिद्ध करणे किंवा त्यासंदर्भात पत्रकार परिषदांमधून माहिती देणे गरजेचे होते. परंतु असे काहीही करण्यात आले नसल्याचे उंबरकर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन हा घोटाळा करण्यात आला असून यातून शासनाचीदेखील फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घोटाळ्यामुळे गरिब लाभार्थी शेतकरी अनुदानावर मिळणाºया चणा बियाणापासून वंचित राहिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अधिकारी, कृषी केंद्रचालकांवर कारवाई करा
सामान्य गरिब शेतकऱ्यांसाठी अनुदानावर असलेल्या बियाणांची खुल्या बाजारात विक्री करण्यात आली असून या घोटाळ्यात सहभागी असलेले कृषी अधिकारी व कृषी केंद्रचालकांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

Web Title: Open market sales of subsidized seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती