शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित गुन्ह्यांच्या फाईली उघडणार

By admin | Updated: September 29, 2014 00:51 IST

न्यायालयीन कामानिमित्त रविवारी दुपारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यवतमाळात दाखल झाले. यावेळी जिल्ह्यातील ठाणेदार आणि प्रलंबित असलेल्या तपासाच्या

आयजींचे आदेश : ठाणेदारांसह तपास अधिकाऱ्यांची कानउघाडणीयवतमाळ : न्यायालयीन कामानिमित्त रविवारी दुपारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यवतमाळात दाखल झाले. यावेळी जिल्ह्यातील ठाणेदार आणि प्रलंबित असलेल्या तपासाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. तसेच तपास प्रलंबित असल्याच्या कारणावरून चांगलीच कानउघाडणी केली. पुसद शहर, पुसद ग्रामीण, महागाव, उमरखेड, दराटी, बिटरगाव, वडगाव रोड, यवतमाळ शहर, पांढरकवडा यासह विविध पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे आणि संपत्तीविषयक गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहे. हा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला असून जिल्ह्यात पोलिसिंग उरली नसल्याची खंत महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी व्यक्त केली. तसेच प्रलंबित तपास तातडीने निकाली काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दमही भरला. यावेळी प्रथमच ठाणेदारांसोबत तपास अधिकाऱ्यांनाही बैठकीला पाचारण करण्यात आले. त्यांचीही पहिलीच बैठक वादळी ठरली. स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या शाखेकडेही तपास प्रलंबित असल्याचे पाहून महानिरीक्षक बिहारी चांगलेच संतप्त झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी बाजू मांडल्याने अनेकजणांचा बचावही झाल्याचे सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)