शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

८५३ लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद आणि एनआरएचएमच्या माध्यमातून मोठा निधी दरवर्षी जिल्ह्याकडे वळता होतो. वाढत्या लोकसंख्येपुढे हा निधी अपुरा पडतो. यामुळे दरवर्षी जितका निधी जिल्ह्याला प्राप्त होतो, तितकाही खर्च होतो. कोरोना काळात राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीसोबत आमदार निधी मोलाची मदत करून गेला आहे.

ठळक मुद्दे२० वर्षापूर्वीच्या लोकसंख्येनुसारच मिळतो आरोग्याचा निधी : लोकसंख्येचा वाढता ताण आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या स्थितीने वाढली डोकेदुखी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची बांधणी २००१ वर्षाच्या लोकसंख्येच्या निकषावर करण्यात आली आहे. यानंतर जिल्ह्याची लोकसंख्या वाढली. मात्र वाढीव लोकसंख्येनुसार पदनिर्मिती झालीच नाही. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळावर आरोग्य यंत्रणेचा डोलारा उभा आहे. यामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोकड्या मनुष्यबळावर कोरोना आणि साथरोगासह इतरही दैनंदिन कामकाजांचा सामना आरोग्य विभागाच्या यंत्रणेला करावा लागत आहे.जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद आणि एनआरएचएमच्या माध्यमातून मोठा निधी दरवर्षी जिल्ह्याकडे वळता होतो. वाढत्या लोकसंख्येपुढे हा निधी अपुरा पडतो. यामुळे दरवर्षी जितका निधी जिल्ह्याला प्राप्त होतो, तितकाही खर्च होतो. कोरोना काळात राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीसोबत आमदार निधी मोलाची मदत करून गेला आहे.कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात आरोग्याची यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. जिल्हास्तरावरील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची दोन पदे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे एक पद, जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याचे एक पद, सहायक संचालक कुष्ठरोग एक पद आहे, तेही रिक्त आहेत. याशिवाय जिल्हा हिवताप अधिकारी हे पदही रिक्तच आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे.

टॅग्स :Healthआरोग्य