मालमत्ता कराचे १४ पैकी केवळ चारच कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:20+5:30

येथील नगरपरिषद ‘अ’ वर्ग दर्जाची आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत कर वसुलीच आहे. मात्र कर वसुलीसाठी नागरिकांना दर्जेदार सोयी, सुविधा पुरविणेही गरजेचे असते. या सुविधा पुरवत असताना पालिकेची दमछाक होते. त्यातही कर वसुली होत नसल्याने सुविधांवर खर्च करणे पालिकेला अवघड जाते. सोयी, सुविधा मिळत नसल्याने नागरिकही कर भरताना हात आखडता घेतात.

Only four crore of fourteen crore the property tax was recovered | मालमत्ता कराचे १४ पैकी केवळ चारच कोटी वसूल

मालमत्ता कराचे १४ पैकी केवळ चारच कोटी वसूल

Next
ठळक मुद्देयवतमाळ पालिका : एक लाख मालमत्तांची कर वसुली अडकली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या हद्दीत जवळपास एक लाख मालमत्ता आहे. त्यांच्याकडून करापोटी १४ कोटींची वसुली अपेक्षित असताना आत्तापर्यंत केवळ चारच कोटी वसूल झाले. आता उर्वरित अडीच महिन्यात कर वसुली होणार किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
येथील नगरपरिषद ‘अ’ वर्ग दर्जाची आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत कर वसुलीच आहे. मात्र कर वसुलीसाठी नागरिकांना दर्जेदार सोयी, सुविधा पुरविणेही गरजेचे असते. या सुविधा पुरवत असताना पालिकेची दमछाक होते. त्यातही कर वसुली होत नसल्याने सुविधांवर खर्च करणे पालिकेला अवघड जाते. सोयी, सुविधा मिळत नसल्याने नागरिकही कर भरताना हात आखडता घेतात. अनेक नागरिक सुविधा पुरवूनही कर भरताना का-कू करतात. यामुळे पालिकेला शहरात सुविधा उपलब्ध करून देताना आर्थिक निधीची अडचण जाते.
मालमत्तांवर कर आकारून तो वसूल करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. कर वसुली झाल्यास पालिकेला शहरात सुविधा आणि विविध उपाययोजना आखणे सुलभ जाते. मात्र कर वसुली होत नसल्याने पालिकेला नागरिकांना सुविधा देताना दहादा विचार करावा लागतो. त्यातही येथील पालिका २० वर्षांपूर्वीच आकारलेला कर वसूल करीत आहे. त्यावेळी पालिका ‘ड’ वर्गात होती. त्यामुळे आत्ताही पालिका ‘अ’ वर्गात येत असूनही ‘ड’ वर्ग पालिकेप्रमाणेच कर वसुली केली जाते. त्यात पूर्ण कर वसूल होत नाही. त्यामुळे पालिकेपुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकते.
यवतमाळ पालिकेत कर वसुलीची यंत्रणाही अपुरी आहे. ज्या यंत्रणेकडे ग्रामीण भागाची कर वसुली सोपविण्यात आली होती, त्या यंत्रणेने वसुलीच केली नाही. शहरी भागातही कर वसुलीचे उद्दीष्ट असताना केवळ जुन्या प्रभागाचीच वसुली करण्यात यश मिळाले. कर वसुलीसाठी २६ कर्मचाऱ्यांची चमू अपुरी पडत आहे. या चमूने १४ कोटींपैकी केवळ चारच कोटींची कर वसुली केली आहे. १० कोटींची वसुली अद्याप बाकी आहे. यामुळे यवतमाळ नगरपरिषदेची आर्थिक स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

सॉफ्टवेअरची गतीही मंदावली
कर वसुली करण्यासाठी पालिकेच्या कर विभागात संगणक बसविण्यात आले. मात्र ऑनलाईनची गती अतिशय मंदावली आहे. परिणामी कर जमा करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकाला किमान अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते. संगणकाची गती मंदावल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागते. यामुळेही कर वसुलीवर परिणाम होत आहे.
अद्ययावत सॉफ्टवेअर यंत्रणा नाही
कोणत्याही करदात्याला घरी बसूनच कर जमा करता येईल, यासाठी शासन अद्ययावत सॉफ्टवेअर विकसित करणार होते. यामुळे कर वसुलीची गती वाढून नागरिकांचा वेळही वाचणार होता. मात्र ही सॉफ्टवेअर यंत्रणा अद्यापही बसविण्यात आली नाही. त्यामुळेही वसुलीत अडचण निर्माण झाली आहे.

Web Title: Only four crore of fourteen crore the property tax was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.