शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचा वचक संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांना विभाग प्रमुख जुमानेसे झाले आहे. अनेकदा सभांमध्ये खुद्द पदाधिकारीच अधिकारी आपले ऐकत नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. यामुळे प्रशासनावर नेमका वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलीजुली सत्ता असल्यामुळे अधिकारी शिरजोर बनले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शिक्षकांचे परस्पर समुपदेशन, स्थायी समितीकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांचा वचक संपल्याची सर्वत्र ओरड होत आहे. खुद्द पदाधिकाऱ्यांनीही गेल्या विशेष सभेत तशी कबुली दिली होती. त्यामुळे शिरजोर प्रशासनाने काही शिक्षकांचे परस्पर समुपदेशन करून त्यांना पदस्थापना दिली आहे.जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. यात ग्रामविकास विभागाने ४ सप्टेंबरला सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत मार्गदर्शक तत्त्वे कळविली. त्यात आंतर जिल्हा बदलीने नव्याने हजर होणारे शिक्षक व पवित्र प्रणालीद्वारे येत असलेल्या शिक्षकांना इतर शिक्षकांसोबतच समुपदेशनाने पदस्थापना देण्याचे सूचित केले आहे. मात्र येथील जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर अशा शिक्षकांना पदस्थापना दिल्याची ओरड होत आहे.समुपदेशनासाठी पारदर्शक पद्धत अवलंबून पात्र शिक्षकांची यादी लावणे गरजेचे होते. मात्र अशी यादीच लागली नाही. पदस्थापना देताना सेवाज्येष्ठतेबाबत यादी ब मधील शिक्षकांचा बदलीसाठी प्राधान्याने विचार करण्यास न्यायालयाचे आदेश असतील तर त्यांना प्रथम प्राधान्याने सेवाज्येष्ठतेनुसार पदस्थापना देण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले. मात्र प्रशासनाने पेसाअंतर्गतच्या काही शिक्षकांना परस्पर पदस्थापना दिल्याची ओरड शिक्षक संघटनांत सुरू आहे. जवळपास २५ च्यावर माध्यमिक शिक्षकांनाही समुपदेशनापूर्वीच पदस्थापना दिल्याचे सांगितले जात आहे.पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्षजिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांना विभाग प्रमुख जुमानेसे झाले आहे. अनेकदा सभांमध्ये खुद्द पदाधिकारीच अधिकारी आपले ऐकत नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. यामुळे प्रशासनावर नेमका वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलीजुली सत्ता असल्यामुळे अधिकारी शिरजोर बनले आहे. यातूनच पदाधिकारी व सदस्यांना डावलले जात आहे. सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती सभेतही पदाधिकारी व सदस्य अगतिक दिसत आहे. आता शिक्षण विभागाने समुपदेशनापूर्वीच काही शिक्षकांची परस्पर पदस्थापना केल्याबद्दल पदाधिकारी व सदस्य कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद