पदाधिकाऱ्यांचा वचक संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:21+5:30

जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांना विभाग प्रमुख जुमानेसे झाले आहे. अनेकदा सभांमध्ये खुद्द पदाधिकारीच अधिकारी आपले ऐकत नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. यामुळे प्रशासनावर नेमका वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलीजुली सत्ता असल्यामुळे अधिकारी शिरजोर बनले आहे.

The office bearers finished | पदाधिकाऱ्यांचा वचक संपला

पदाधिकाऱ्यांचा वचक संपला

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : शिक्षकांचे परस्पर समुपदेशन, स्थायी समितीकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांचा वचक संपल्याची सर्वत्र ओरड होत आहे. खुद्द पदाधिकाऱ्यांनीही गेल्या विशेष सभेत तशी कबुली दिली होती. त्यामुळे शिरजोर प्रशासनाने काही शिक्षकांचे परस्पर समुपदेशन करून त्यांना पदस्थापना दिली आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेने वेग घेतला आहे. यात ग्रामविकास विभागाने ४ सप्टेंबरला सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत मार्गदर्शक तत्त्वे कळविली. त्यात आंतर जिल्हा बदलीने नव्याने हजर होणारे शिक्षक व पवित्र प्रणालीद्वारे येत असलेल्या शिक्षकांना इतर शिक्षकांसोबतच समुपदेशनाने पदस्थापना देण्याचे सूचित केले आहे. मात्र येथील जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर अशा शिक्षकांना पदस्थापना दिल्याची ओरड होत आहे.
समुपदेशनासाठी पारदर्शक पद्धत अवलंबून पात्र शिक्षकांची यादी लावणे गरजेचे होते. मात्र अशी यादीच लागली नाही. पदस्थापना देताना सेवाज्येष्ठतेबाबत यादी ब मधील शिक्षकांचा बदलीसाठी प्राधान्याने विचार करण्यास न्यायालयाचे आदेश असतील तर त्यांना प्रथम प्राधान्याने सेवाज्येष्ठतेनुसार पदस्थापना देण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले. मात्र प्रशासनाने पेसाअंतर्गतच्या काही शिक्षकांना परस्पर पदस्थापना दिल्याची ओरड शिक्षक संघटनांत सुरू आहे. जवळपास २५ च्यावर माध्यमिक शिक्षकांनाही समुपदेशनापूर्वीच पदस्थापना दिल्याचे सांगितले जात आहे.

पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांना विभाग प्रमुख जुमानेसे झाले आहे. अनेकदा सभांमध्ये खुद्द पदाधिकारीच अधिकारी आपले ऐकत नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. यामुळे प्रशासनावर नेमका वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलीजुली सत्ता असल्यामुळे अधिकारी शिरजोर बनले आहे. यातूनच पदाधिकारी व सदस्यांना डावलले जात आहे. सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती सभेतही पदाधिकारी व सदस्य अगतिक दिसत आहे. आता शिक्षण विभागाने समुपदेशनापूर्वीच काही शिक्षकांची परस्पर पदस्थापना केल्याबद्दल पदाधिकारी व सदस्य कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: The office bearers finished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.