शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची ‘वारी’ आमदारांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

ओबीसी व्हीजे संघर्ष समिती, ओबीसी जनमोर्चा, महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटनांच्यावतीने निवेदन देताना विविध मागण्या करण्यात आल्या. ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीची मेगा भरती तात्काळ करावी, यवतमाळ जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १४ ऐवजी १९ टक्के करावे आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. 

ठळक मुद्देभारतीय पिछडा संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ओबीसी जनमोर्चा आणि भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्यावतीने ओबीसी संघर्षाची वारी आमदारांच्या दारी हे अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार यांना निवेदन सादर करण्यात आले. ओबीसी व्हीजे संघर्ष समिती, ओबीसी जनमोर्चा, महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटनांच्यावतीने निवेदन देताना विविध मागण्या करण्यात आल्या. ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीची मेगा भरती तात्काळ करावी, यवतमाळ जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १४ ऐवजी १९ टक्के करावे आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर गोरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विलास काळे, उत्तम गुल्हाने, ॲड. राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, ज्ञानेश्वर रायमल, प्रसिद्धी प्रमुख संतोष डोमाळे, ॲड. अरुण मेहेत्रे, जिल्हा सचिव विनोद इंगळे, प्रमोद राऊत, भाविक ठक, मोहन लोखंडे, विठ्ठल नागतोडे, दिलीप बेलसरे, मनोज पाचघरे, शीतल मेश्राम, गजानन राऊत, राजेंद्र इंगळे, अशोक उंबरकर, सागर काळे, अभियंता अरुण सागळे, कमलाताई खंडारे, मायाताई गोरे, दीपक वाघ आदी यावेळी उपस्थित होते.या संघटनांच्यावतीने ओबीसींचे विविध प्रश्न मार्गी लावण्याच्यादृष्टीने पाठपुरावा केला जात आहे. विविध प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न होत आहे. आता शासनाकडून यासंदर्भात काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती