शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोना बाधित पोलिसांचा आकडा तीनशेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

कोरोनाने जिल्हा पोलीस दलातील प्रमुखांना ही संसर्गापासून सोडले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हेसुद्धा कोरोनाबाधित झाले. कोरोनावर मात करून गेल्या आठवड्यात धारणे तर सोमवारी १२ एप्रिलला एसपी डॉ. भुजबळ कार्यालयात परतले. यावेळी धारणे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी यांनी एसपीचे स्वागत केले.

ठळक मुद्देएसपी, ॲडिशनल एसपींसह ४३ अधिकारी : दोन कर्मचाऱ्यांचा रोखला श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख फ्रंट लाईन वर्कर असलेल्या जिल्हा पोलीस दलातही कोरोना संसर्ग खोलवर रुजताना दिसतो आहे. आतापर्यंत पोलिसातील तब्बल २९२ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामध्ये ४३ अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या या लढ्यात आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने जिल्हा पोलीस दलातील प्रमुखांना ही संसर्गापासून सोडले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हेसुद्धा कोरोनाबाधित झाले. कोरोनावर मात करून गेल्या आठवड्यात धारणे तर सोमवारी १२ एप्रिलला एसपी डॉ. भुजबळ कार्यालयात परतले. यावेळी धारणे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी यांनी एसपीचे स्वागत केले. यानिमित्ताने गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलातील कोरोना बाधितांच्या आकड्यावर नजर टाकली असता हा आकडा तीनशेच्या दिशेने निघाल्याचे आढळून आले. आतापर्यंत २९२ जणांना पोलीस दलात कोरोना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी ४३ अधिकारी तर २४९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील यवतमाळ शहर ठाण्यातील पोलीस हवालदार व पांढरकवडा ठाण्यातील नायक पोलीस शिपायाचा काेरोनाने मृत्यू झाला. २९२ पैकी २३६ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून ते कोरोनामुक्त होऊन कार्यालयात परतले आहे. तर दहा अधिकारी व ४४ कर्मचारी अद्यापही असे ५४ जण  कोरोनाशी लढा देत आहेत. ते सर्वजण गृह विलगीकरणात आहेत. सोमवारी कार्यालयात परतलेल्या एसपी भुजबळ यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुष्पवर्षाव करून    उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास  कोरोना बाधित झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी खासगी उपचार ऐवजी शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास दर्शवित सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याला पसंती दर्शविली. समाजातील विविध घटकांनीसुद्धा शासकीय कोविड सेंटरमध्येच दाखल होणे पसंत केले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस