शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

आता सैन्यभरतीची प्रक्रिया होणार आॅनलाईन

By admin | Updated: August 21, 2015 02:54 IST

आजवर खुल्या पद्धतीने होणारी सैन्य भरतीची प्रक्रिया यापुढे आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे भरतीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो तरुणांचा...

यवतमाळ : आजवर खुल्या पद्धतीने होणारी सैन्य भरतीची प्रक्रिया यापुढे आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे भरतीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो तरुणांचा वेळ आणि पैसाही कमी प्रमाणात खर्च होईल, अशी माहिती नागपूरचे आर्मी रिक्य्रूटमेंट आॅफिसर कर्नल एम. के. जोशी यांनी गुरुवारी दिली.माहिती अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार ते बोलत होते. नव्या भरती प्रक्रियेची माहिती देताना कर्नल जोशी म्हणाले, पूर्वी ठरावीक ठिकाणी आयोजित भरतीसाठी उमेदवारांना कोणताही अर्ज न करता थेट येण्याची मुभा होती. परंतु, अनेक कसोट्यांमध्ये उत्तीर्ण होताना या तरुणांना काही दिवस मुक्कामी राहावे लागायचे. त्यात वेळ व पैसा अधिक लागायचा. आता आॅनलाईन सैन्य भरतीसाठी ‘जॉईन इंडियन आर्मी डॉड नीक डॉट इन’ ही वेबसाईट बनविण्यात आली आहे. त्यावरच उमेदवारांना आॅनलाईन नोंदणी करून अर्ज करावा लागणार आहे. भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या ४५ दिवसांपूर्वी या संकेतस्थळावर नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. भरती जाहीर झाल्यानंतर तरुणांना लॉग-इन करण्याची सुविधा साईटवर सुरू करण्यात येईल. आॅनलाईन नोंदणी करताना उमेदवारांकडे आवश्यक ती पात्रतेची कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. पूर्वी खुल्या भरतीप्रक्रियेदरम्यान एखाद्या कसोटीत अनुत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराचा जाण्या-येण्याचा, निवास-भोजनाचा खर्च व्यर्थ जात होता. आता आॅनलाईन प्रक्रियेदरम्यान, एखाद्या कसोटीत बसत नसल्यास त्याला आॅनलाईनच ‘रिजेक्ट’ करण्यात येईल. त्यामुळे निदान त्याचा खर्च तरी वाचणार आहे. तर निकषात बसणाऱ्या तरुणांना याच संकेतस्थळावर पुढील परीक्षा व शारीरिक चाचण्यांसाठी ‘अ‍ॅडमिट कार्ड’ देण्यात येणार आहे, असे कर्नल जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट धनंजय सदाफळ, सहायक सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार वसंत मत्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)