शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

आता जंगलात आग लावाल तर थेट तुरुंगात जावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वन विभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वन विभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर  द्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : वनसंपदेने नटलेल्या पांढरकवडा तालुक्यातील जंगलात उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. यामुळे जैवविविधता धाेक्यात येते. मात्र, जंगलात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता वन विभागाने कंबर कसली  आहे. जंगलात आग लावणाऱ्यांना थेट कारागृहात पाठविण्याची तयारी वन विभागाने केली आहे. पांढरकवडा वन विभागातील सर्वच क्षेत्रांत फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यांपासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वन कर्मचाऱ्यांना ‘जागते रहाे’च्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळरेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अग्निरक्षकाची नेमणूक आणि रात्रंदिवस वणवा संवेदनशील क्षेत्रात गस्त आदी बाबींचा समावेश आहे. वणवा नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी जागरूक नागरिकांनी पुढाकर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये काम करताना कचरा पेटवून दिला जाताे. गवत चांगले यावे यासाठी आग लावली जाते. वनातून जाताना बिडी, सिगारेट फेकली जाते. त्यामुळे आग लागून माेठे नुकसान हाेते. यापूर्वी या भागात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. वन कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एक वर्ष कारावास अन् पाच हजार रुपये दंड राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वन विभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वन विभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर  द्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

वणव्याचा विस्तार थांबविण्यात फायर अलर्ट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आकाशात असलेले सॅटेलाइट आगीच्या घटनेची नाेंद घेते व तसा संदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविते. हा संदेश लगेच वनरक्षकाला प्राप्त होतो. वनरक्षक व त्याची यंत्रणा त्या ठिकाणी पाेहाेचून आग आटोक्यात आणतात. त्यामुळे आगीचा विस्तार थांबण्यास माेठी मदत हाेते.   - किरण जगताप, उपवनसंरक्षक.

 

टॅग्स :fireआगforest departmentवनविभाग