शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय क्षेत्रात शॉर्टकट नव्हे, मेहनत हवी

By admin | Updated: September 15, 2014 00:24 IST

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शॉर्टकट उपयोगाचा नाही. यशासाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द हवी. अभिनय क्षेत्रात तर मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही, असे ‘फू बाई फू’ अंतिम

यवतमाळ : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शॉर्टकट उपयोगाचा नाही. यशासाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द हवी. अभिनय क्षेत्रात तर मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही, असे ‘फू बाई फू’ अंतिम पर्वाचा महाविजेता आणि वैदर्भीय अभिनेता भारत गणेशपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वऱ्हाडी बोलीने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा आणि विनोदाचा बादशहा असलेला हा मूळ अमरावतीचा कलावंत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळात आला होता. त्यावेळी त्याने आपल्या अस्सल वऱ्हाडी शैलीत ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा मारल्या. ‘फू बाई फू’ या हास्य कार्यक्रमाने भारत यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. ‘निशाणी डावा अंगठा’ ‘धोबी पछाड’ ‘पोस्टर बॉईज’ आदी चित्रपटात त्याने कसदार भूमिका वठविल्या आहे. निशाणी डावा अंगठातील झुंबड गुरुजीने ग्रामीण शिक्षकाचे अस्सल चित्रण भारतने केले आहे. शब्दफेक व अभिनयाने तो मराठी चित्रपटसृष्टीत आपला झेंडा रोवत आहे. मराठी चित्रपटासंदर्भात म्हणाला, पूर्वीच्या तुलनेत आता चित्रपटांनी कात टाकण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या काळात वास्तवादी विषय हाताळले जात आहे. जीवनपटावर आधारित आणि खलनायकविरहीत चित्रपट आले आहे. नवीन दिग्दर्शकांनी या वास्तववादी धोरणाचा अवलंब केला. त्यामुळेच मराठी चित्रपट आज प्रेक्षकाभिमुख होत आहे. मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाही, असे विचारताच भारत म्हणाला, पूर्वी असे होते. परंतु तो काळ आता संपला आहे. नुकत्याच प्रदर्शित पोस्टर बॉईज या चित्रपटाने ४० कोटींचा बिझनेस केला तर रितेश देशमुखचा लय भारी चित्रपट २२ कोटीपर्यंत आणि रेगे हा चित्रपट दहा कोटीपर्यंत पोहोचला आहे. वैदर्भीय कलावंतांना चित्रपट सृष्टीत मोठा वाव आहे. त्यासाठी संयम ठेवण्याची गरज आहे. प्रत्येकाला चित्रपट सृष्टीत संधी मिळते. मात्र या संधीचे सोने करणे गरजेचे आहे. दिग्दर्शन, मेकअप, पटकथा या क्षेत्रातही वैदर्भीय मंडळींनी पुढे येण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. मी २००६ पासून चित्रपट सृष्टीत आहे. अलीकडेच प्रदर्शित होणारा आणि नाना पाटेकरांची मध्यवर्ती भूमिका असलेला डॉ.प्रकाश आमटे या चित्रपटात साकारलेली माझी भूमिका मला अत्यंत आवडल्याचे भारत म्हणतो. (शहर वार्ताहर)