शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निम्न पैनगंगा भूसंपादनात नऊ कोटींची अफरातफर

By admin | Updated: January 18, 2017 00:02 IST

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये तब्बल नऊ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे पुढे आले असून

तलाठी मुख्य आरोपी : ४६ शेतकऱ्यांचा सातबारा बदलविला आर्णी : निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये तब्बल नऊ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी खडका येथील सेवानिवृत्त तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तलाठ्याने ४६ शेतकऱ्यांच्या सातबारा बदलविल्याचा आरोप आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी भूसंपादन करताना तत्कालीन तलाठी विनोद हरिभाऊ ठाकरे (६०) यांनी शेतकऱ्यांच्या मूळ सातबारा ऐवजी बनावट सातबारा दिले. त्यामध्ये सातबाराचा आकार बदलविणे, सिंचन क्षेत्र नसताना सिंचन दाखविणे आदी बाबी केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या प्रकरणी यवतमाळ येथील प्रा.डॉ. प्रदीप राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून नांदेड जिल्हाधिकारी आणि यवतमाळचे उपविभागीय अधिकारी यांची चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील २०० हेक्टर जमिनीचा खरेदी मोबदला शेतकऱ्यांना आठ कोटी ७७ लाख ४१ हजार ३८४ रुपये नियमबाह्य प्रदान करण्यात आल्याचे चौकशीत पुढे आले. २००९-१० या कालावधीत धरण रेषा व बुडित क्षेत्रातील खडका येथील ४६ शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने खरेदी केल्या आहे. यात २०१२ मध्ये खरेदी संबंधित तक्रार प्राप्त झाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये सरळ खरेदी वेळी शेतकऱ्यांनी सादर केलेले महसूल खात्याचे सातबारा व मूळ सातबारा यामध्ये तफावत असल्याचे पुढे आले. यावरून यामध्ये अफरातफर झाल्याचे पुढे आले. अखेर आर्णी येथील तहसीलदार सुधीर पवार यांनी सोमवारी घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तत्कालीन तलाठी विनोद ठाकरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी) आरोपी केवळ तलाठी कसा ? कुठल्याही प्रकल्पासाठी भूसंपादन करताना महसुलातील संपूर्ण यंत्रणा या कामाला लागते. जागेचे अवार्ड काढताना भूसंपादन अधिकारी, संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि शेवटी तलाठी अशी यंत्रणा काम करते. शिवाय जमीन संपादन करताना भूमिअभिलेख विभागाचा अहवालही महत्वाचा मानला जातो. मात्र आर्णी तालुक्यातील भूसंपादन प्रकरणातील अफरातफरीत केवळ तलाठ्यावरच आरोप निश्चित करण्यात आले. नऊ कोटी रुपयांच्या प्रकरणात केवळ तलाठीच आरोपी कसा असा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रकरणात अनेक मोठे मासेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.