शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

बुधवारी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पुसद (४), दिग्रस (४) व महागाव (१) तालुक्यातील आहेत. पुसद तालुक्यातील निंभी, हुडी, दिग्रसमधील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून परत आलेले आहे. एकाच वाहनातून त्यांनी प्रवास केल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्रीही पुसद तालुक्यातील हुडीची रहिवासी असलेली एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. तिचा पतीसुद्धा यापूर्वीच पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देअ‍ॅक्टीव्ह बाधितांचा आकडा १६ : पुसद, दिग्रस, महागाव तालुक्यात शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आतापर्यंत शहरात असलेला कोरोना उद्रेक नियंत्रणात असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असतानाच तो मात्र औटघटकेचा ठरला. कोरोनाने आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दूरवर शिरकाव केला आहे. बुधवारी एकाच वेळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा हादरले आहे.बुधवारी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पुसद (४), दिग्रस (४) व महागाव (१) तालुक्यातील आहेत. पुसद तालुक्यातील निंभी, हुडी, दिग्रसमधील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून परत आलेले आहे. एकाच वाहनातून त्यांनी प्रवास केल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्रीही पुसद तालुक्यातील हुडीची रहिवासी असलेली एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. तिचा पतीसुद्धा यापूर्वीच पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते. मंगळवारी सायंकाळी हुडी गावातील गौतम कांबळे (५५) या इसमाचा पुसद येथे वैद्यकीय तपासणी करून परत जात असताना मार्गातच मृत्यू झाला. परंतु त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.बुधवारच्या नऊ पॉझिटिव्हसह जिल्ह्यातील बाधित अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंतचा एकूण बाधितांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे. त्यापैकी ९६ जण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा पाचपर्यंत खाली आला होता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसात त्यात झपाट्याने वाढ झाल्याने तो १६ वर पोहोचला आहे.बाधित पुसदच्या विलगीकरण कक्षातबुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या पुसद, दिग्रस व महागावच्या रुग्णांना सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणांतर्गत कोविड केअर सेंटर येथे भरती आहेत. पुसद येथील सुरवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकूण १७ लोकांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यापैकी ९ पॉझिटिव्ह, ६ निगेटिव्ह आणि २ रिपोर्ट अप्राप्त आहे.२१ अहवालांची अद्याप प्रतीक्षासुरवातीपासून आतापर्यंत शासकीय महाविद्यालयाने एकूण १८४७ नमुने तपासणीकरिता पाठविले. यापैकी आतापर्यंत ११२ पॉझिटिव्ह, १७१६ निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले तर २१ रिपोर्ट अप्राप्त आहेत. संस्थात्मक विलगीकरणात १४ जण आणि गृहविलगीकरणात ५८१ जण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या