शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

नवी सार्वजनिक बांधकामे मार्चपर्यंत थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 18:19 IST

कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले महाराष्ट्र शासन आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे. त्याचा फटका जनहिताच्या विविध योजनांनाही बसतो आहे.

ठळक मुद्देसचिवांचा आदेश, असमतोल निर्माण झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले महाराष्ट्र शासन आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे. त्याचा फटका जनहिताच्या विविध योजनांनाही बसतो आहे. याच आर्थिक टंचाईतून सार्वजनिक बांधकाम खात्याने नव्याने हाती घेतलेली आणि अर्थसंकल्पीय पुस्तकात नमूद केलेली बांधकामे ३१ मार्च २०२० पर्यंत थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत.गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी यांनी या संबंधीचे आदेश राज्यातील सर्व मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंत्यांना पाठविले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पुलांची कामे, परीक्षण व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. ही कामे विविध कार्यक्रम, योजनांमधून पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित केलेले असते. मात्र मंजूर करण्यात आलेली कामे व प्राप्त होणारा निधी यामध्ये तफावत असल्याची गंभीरबाब निदर्शनास आली आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याला विविध मार्गाने प्राप्त होणाऱ्या निधीतून सन २०१९-२० पूर्वी हाती घेतलेली कामे व सन २०१९-२० या वर्षात नव्याने घेतल्या जाणाऱ्या कामांकरिता निधी उपलब्ध केला जातो. परंतु हाती घेतलेल्या कामांची संख्या व निधी उपलब्ध होण्याचे प्रमाण लक्षात घेता त्यात विषमता व असमतोल निर्माण झाला आहे. म्हणूनच निधीचे नियोजन केले जात आहे. २०१९-२० मध्ये उपलब्ध होणाऱ्या निधीवर कमी ताण यावा या दृष्टीने प्रयत्न होत आहे.

सुरू झालेल्या कामांना अडसर नाहीराज्यात सध्या सुरू असलेल्या कामांपैकी काही कामांचे उद्दीष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने बांधकाम खात्याला उपलब्ध निधी व भविष्यात येणारा निधी विचारात घेऊन नियोजन केले जात आहे. प्रत्यक्ष सुरू झालेल्या कामांना निधीचा कोणताही अडथळा नाही. परंतु जे कामे नव्याने हाती घेतली गेली आहे किंवा अर्थसंकल्पीय पुस्तकांमध्ये समाविष्ठ केली आहे, ज्या कामांचे अद्याप कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) जारी झालेले नाहीत अशा सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही ३१ मार्च २०२० पर्यंत संस्थगित करण्यात आली आहे. सचिव चंद्रशेखर जोशी यांनी आपल्या आदेशात ही बाब स्पष्ट केली आहे. परंतु आशियाई बँक सहाय्यीत व हायब्रीड अ‍ॅन्युईटी योजनेच्या कामांना १४ नोव्हेंबरचा हा आदेश लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.हे आहेत निधीचे स्त्रोतबांधकाम खात्याला राज्य योजना, योजनेत्तर योजना, नाबार्ड, केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ), अ‍ॅन्युईटीच्या धर्तीवर आशियाई विकास बँक अर्थसहाय्य (एडीबी) व केंद्र शासन अर्थसाहाय्यित अशा विविध मार्गांनी निधी प्राप्त होतो.

टॅग्स :Governmentसरकार