नेर शहरातील चार परिसर केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नेर : शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रविवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या ...

Ner sealed four premises in the city | नेर शहरातील चार परिसर केले सील

नेर शहरातील चार परिसर केले सील

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये अचानक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रविवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या १३ वर पोहोचली आहे. दरम्यान, शहरातील शिवाजीनगर, टोलीपुरा, अंबिकानगर सील करण्यात आले आहे. शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
येथील एका हार्डवेअर दुकानात दिवानजी असलेला तेलीपुरा भागातील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कातील १९ जणांना कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले. यातील नऊ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्यापैकी हार्डवेअर मालकाच्या वडिलांचा शनिवारी मृत्यू झाला. आता या हार्डवेअर मालकाची आई, दुकानातील नोकर, दिवानजीची पत्नी, मुलगा यासह आठ जण पॉझिटिव्ह निघाले आहे.
नेर शहर, पाथ्रड(गोळे) आणि कारखेडा येथील एकूण ३४ जणांची कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर, टोलीपुरा, अंबिकानगर सील करण्यात आले. शहराने परिसरात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्हचे पुणे कनेक्शन आहे. आता या हार्डवेअरमधून किती लोकांनी साहित्य नेले, नऊ पॉझिटिव्ह कुणाकुणाच्या संपर्कात आले याचाही शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
तहसीलदार अमोल पोवार, मुख्याधिकारी नीलेश जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक खोडवे, प्रभारी विस्तार अधिकारी अशोक राऊत, नानासाहेब घोंगळे, शंकर भागडकर यासह पोलीस, नगरपरिषद, महसूल विभागाची यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.

Web Title: Ner sealed four premises in the city