शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीत तंबाखूमुक्तीचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Updated: October 12, 2015 02:32 IST

तंबाखूमुक्त शाळांमध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी आता ‘नंबर वन’कडे ...

अविनाश साबापुरे यवतमाळतंबाखूमुक्त शाळांमध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी आता ‘नंबर वन’कडे वाटचाल सुरू केली आहे. येत्या नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. शाळांपासून १०० यार्डपर्यंत कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याच आधारे राज्य शासनानेही ७ जुलै २०१५ रोजी तंबाखूमुक्त शाळेचे निकष ठरवून दिले. यवतमाळ जिल्हा परिषदेने आतापर्यंत जिल्ह्यातील १६ शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन एकत्र येऊन शिक्षकांना मार्गदर्शन दिले जात आहे.जिल्ह्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करून प्रत्येक शाळेने तंबाखूमुक्त झाल्याचे फलक शाळेत झळकविण्याच्या सूचना आहेत. १३ आॅक्टोबरला मुख्याध्यापकांनी तंबाखूबंदीची नोटीस शाळेत लावावयाची आहे. ‘मास्टर ट्रेनर्स’नी त्याविषयी सर्वांना सजग करावयाचे आहे. १४ आॅक्टोबरला तंबाखू या विषयावर विद्यार्थ्यांची पोस्टर बनविणे आणि घोषवाक्य स्पर्धा घ्यायची आहे. १५ आॅक्टोबरला ‘नो स्मोकिंग’चे फलक लावायचे आहेत. १६ आॅक्टोबरला मुख तपासणी करण्यात येणार आहे. १७ व १८ आॅक्टोबरला गावकऱ्यांना तंबाखू सोडण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. १९ आॅक्टोबरला गटशिक्षणाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना शाळेने तंबाखूमुक्तीसाठी केलेले प्रयत्न कळवायचे आहेत. २० आॅक्टोबरला शिक्षक, विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. २१ आॅक्टोबरला शाळा तंबाखूमुक्त झाल्याचे समारंभपूर्वक घोषित करण्यात येईल. ‘तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक प्रवेशद्वारावर झळकविण्यात येईल.