शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग केला १२ मीटरने अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-माहूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१-ए किनवट शहरातून जात आहे. पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याचे सांगत शिवाय तशी तक्रार करत किनवटच्या जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर कामासाठी राष्ट्रीय महामार्गाची रूंदी १२ मीटरने कमी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : इको सेन्सेटिव्ह झोनचा बाऊ करत किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी ३० मीटरवरून १८ मीटर करण्यात आली. या प्रश्नावर पुन्हा बैठक लावण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली आहे. नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-माहूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१-ए किनवट शहरातून जात आहे. पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याचे सांगत शिवाय तशी तक्रार करत किनवटच्या जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर कामासाठी राष्ट्रीय महामार्गाची रूंदी १२ मीटरने कमी करण्यात आली. ही बाब माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व पुसदचे उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवेदन स्वीकारून प्रश्न     निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष साजिद    खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, शिवसेनेचे व्यंकट भंडारवार, कचरू जोशी, रोहिदास जाधव आदींची उपस्थिती होती.

काही भागातच कमी केले अंतर, कारण काय?- किनवट शहरातून जाणारा हा मार्ग आयप्पा स्वामी मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ३० मीटर रूंदीचा होणार आहे. मग जिजामाता चौक ते अशोक स्तंभ हा २०० मीटर लांबीचा रस्ता १८ मीटर रूंदीचा कसा, असा प्रश्न या प्रतिनिधी मंडळाने उपस्थित केला आहे. या मार्गावरील अतिक्रमण धारकांच्या निवेदनावर मंजूर केलेल्या ठरावासंदर्भात पुन्हा योग्य पद्धतीने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घ्यावी, अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली.