शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महावीरनगरातील नागरिक भोगताहेत नरकयातना

By admin | Updated: July 23, 2014 23:50 IST

करापोटी हजारो रुपये वसूल करत असतानाही नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकडे शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. २५ ते ३० वर्षांपासून निर्माण झालेल्या

यवतमाळ : करापोटी हजारो रुपये वसूल करत असतानाही नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकडे शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. २५ ते ३० वर्षांपासून निर्माण झालेल्या वसाहतींमध्ये साध्या नाल्याही नाहीत. सांडपाणी भररस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. शिवाय रस्त्याची समस्याही गंभीर आहे. वाहन चालविणे तर दूर पायदळ चालणेही या भागातून कठीण झाले आहे. वॉर्डाशी संबंधित सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा पाढा वाचल्यानंतरही होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या महावीरनगरातील नागरिकांनी सदस्य विक्की राऊत यांच्यासह सरपंच, ग्रामसेवकांकडे रस्ता, नाली आणि पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अजूनही या समस्या निकाली काढण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही. नाल्या नसल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जात आहे. जागोजागी डबके साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. या भागातील बहुतांश रस्ते पायदळ चालण्यायोग्यही नाही. काही वर्षांपूर्वी झालेले संपूर्ण डांबरीकरण उखडले. यानंतर कधीही रस्ता दुरुस्तीची तसदी ग्रामपंचायतीने घेतली नाही. लोकप्रतिनिधींच्या निधीतून झाली तेवढी कामे करण्यात आली. परिणामी रस्त्यावर पडलेले खड्डे कित्येक वर्षांपासून अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. वाहनाने जायचे झाल्यास संपूर्ण शरीर खिळखिळे होते. पायदळ चालणे म्हणजे जीवावर उदार होणे होय. या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु निधी नसल्याचे कारण सांगत समस्याग्रस्त नागरिकांना वाटी लावल्या गेले. सदर भागातील नागरिक कराचा भरणा नियमित करतात. त्यांना परिसरातील समस्या सोडविण्याची आशा आहे. पण गेली २५ ते ३० वर्षांपासूनचा समस्यांचा वनवास सुटला नाही. पावसाळ्यात तर प्रचंड हाल होतात. ही बाब माजी आणि विद्यमान सरपंच, सचिवांकडे मांडण्यात आली. त्यांनी केवळ आश्वासने दिली. आश्वासन प्रत्यक्ष केव्हा पूर्ण होईल याची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनावर प्रवीण शहाकार, मंगेश सोईतकर, पद्माकर सावळकर, राजेश सोईतकर, मिलिंद कहाते, बबन कहाते, अनंत राजूरकर, विनोद विठाळकर, नरेंद्र शेळके, बबनराव पोहरे, संध्या चौधरी, राजेश काळे, किरण चिव्हाणे, अनिल चानेकर, सुनील सावजी, कापशीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)