शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीचा फलक नावापुरता

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर एमआयडीसीचा फलकही लावण्यात आला. मात्र एकही उद्योग येथे उभा राहू शकला नाही.

महागाव : तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर एमआयडीसीचा फलकही लावण्यात आला. मात्र एकही उद्योग येथे उभा राहू शकला नाही. एमआयडीसीचा फलक आता बेरोजगारांना वाकुल्या दाखवित आहे.महागाव तालुक्याचा समावेश पूर्वी पुसद तालुक्यात होता. त्यावेळी सर्व सूत्रे पुसदवरून हालत होती. वसंतराव नाईकांच्या कार्यकाळात पुसद येथे सूत गिरणी आणि पोफाळी येथे साखर कारखान्याची निर्मिती झाली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी पिंपळगाव येथे सूत गिरणी आणि गुंज येथे साखर कारखाना सुरू केला. त्यामुळे शेकडो तरुणांना रोजगार मिळाला. मात्र सहकारातील या संस्था डबघाईस आल्या आहे. साखर कारखाना तर बंदच पडला आहे. महागाव तालुक्याच्या निर्मितीनंतर येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर प्लॉट पाडण्यात आले. मात्र कुणीही उद्योग उभारण्यास पुढे आले नाही. सध्या या ठिकाणी केवळ गवताचे साम्राज्य आहे. उद्योग येईल, अशी कोणतीही आशा सद्यातरी दिसत नाही. तालुक्यातील अनेक बेरोजगार कामाच्या शोधात मुंबई, पुण्याकडे धाव घेतात. परंतु गावात त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. अनेकांनी लघु उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र भारनियमनाने उद्योग अखेरच्या घटका मोजत आहे. महागाव तालुक्यातील सहकारातील उद्योग डबघाईस आले. नवीन उद्योग उभारायला कुणी पुढे येत नाही. त्यामुळे बेरोजगारांची फौज तालुक्यात निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)