शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे आंदोलन

By admin | Updated: October 27, 2014 22:44 IST

विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देण्यात आली. अजूनही प्रश्न निकाली निघाली नसल्याने जिल्ह्यातील

खोटी आश्वासने : जिल्हा परिषद प्रशासनावर रोषयवतमाळ : विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देण्यात आली. अजूनही प्रश्न निकाली निघाली नसल्याने जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी सोमवारपासून बेमुदत असहकार आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष व्ही.आर. देशमुख यांच्या अध्यक्षतेत सभा झाली. यात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. सामान्य व पाणी फंड वगळून इतर बाबींचा अहवाल न देणे, मिटिंगला न बसणे आणि योजनेचे काम न करणे आदी स्वरूपाचे हे आंदोलन आहे. यानंतरही प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. सभेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.के. जाधव, सचिव रमेश जारोंडे, उपाध्यक्ष संजय दुधे, कोषाध्यक्ष अजय उपलेंचवार, प्रसिद्धी प्रमुख सुभाष भोयर, उपाध्यक्ष गावंडे, तालुकाध्यक्ष हजारे, म्हातारमारे, मोघे, सुखदे, धामणकर, पतसंस्था अध्यक्ष राजेश साव, पारधी, पुलाते, फुले, हांडे आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावी, १२ व २४ वर्षांची कालबद्ध आणि आश्वासित योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक पूरस्कार मिळावे, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे, सेवानिवृत्त आणि दिवंगत ग्रामसेवकांना पेन्शन चालू करावी, संशयित अफरातफरीची प्रकरणे निकाली काढावी, गंभीर गुन्हा नसताना एफआयआर दाखल करू नये आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. (वार्ताहर)