शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर मोझॅक तर कपाशीवर लाल्या

By admin | Updated: September 25, 2014 23:36 IST

निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणारा शेतकरी पुरता हतबल झाला असून सध्या पोफाळी परिसरातील सोयाबीनवर मोझॅक तर कपाशीवर लाल्याने आक्रमण केले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती

स्वप्नील कनवाळे - पोफाळी निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणारा शेतकरी पुरता हतबल झाला असून सध्या पोफाळी परिसरातील सोयाबीनवर मोझॅक तर कपाशीवर लाल्याने आक्रमण केले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली असून दररोज तापणाऱ्या उन्हामुळे कीड नियंत्रणही अशक्य होत आहे. पोफाळी परिसरात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कपाशी आणि सोयाबीनची लागवड केली. सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच आता किडींनी आक्रमण केले आहे. पोळ्याच्या आठवड्यात झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कपाशीला दिलासा मिळाला. पिके जोमाने वाढू लागली आहे. अशा स्थितीत सोयाबीनवर मोझॅक या रोगाचे आक्रमण झाले आहे. पाने पिवळी पडून सोयाबीन वाळत आहे. परिसरातील कोणत्याही शेतावर नजर टाकल्यास पिवळे जर्द झालेले सोयाबीनचे शेत दिसून येतात. यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरण्याची प्रक्रिया मंदावली असून अनेक ठिकाणी तर शेंगांमध्ये दाणेच दिसत नाही. अशीच स्थिती कपाशीचीही झाली आहे. विविध किडींनी आक्रमण केले आहे. मात्र लाल्याच्या आक्रमणाने शेतकरी पुरता हादरला आहे. कृषी विभागही यावर कोणत्याच उपाययोजना सूचविताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. सध्या निवडणुकांचा ज्वर चढल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. अशा स्थितीत संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे.