शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी परिसर चोरट्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

निर्जनस्थळी टोळक्याने बसून गांजा सेवन केले जाते. येथूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळते. टेक्सटाईल  झोन अंतर्गत एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. वडगावला लागून असलेल्या मोकळ्या जागेत झुडुपांचा आसरा घेऊन रात्री पार्टी रंगते. येथे दररोजच शेकोटी पेटवून मद्यसेवन केले जाते. संपूर्ण परिसरातच दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. पोलिसांची गस्त संपेपर्यंत चोरटे तेथे ठिय्या देऊन असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. सध्या आर्णी रोड परिसरात व वाघापूर बायपास परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या घरफोड्या थांबविण्यासाठी पोलीस रस्त्यावर पेट्रोलिंग करीत आहेत. मात्र चोर त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत असून, लोहारा व एमआयडीसीतील खुल्या मैदानात चोरटे रात्रीचा आश्रय घेतात. तेथे मद्यपान, गांजा सेवन करून चोरी करायला निघतात. बुधवारी येथील वडगाव नजीकच्या एमआयडीसी परिसरात चोरीच्या दोन दुचाकी आढळल्या. निर्जनस्थळी टोळक्याने बसून गांजा सेवन केले जाते. येथूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळते. टेक्सटाईल  झोन अंतर्गत एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. वडगावला लागून असलेल्या मोकळ्या जागेत झुडुपांचा आसरा घेऊन रात्री पार्टी रंगते. येथे दररोजच शेकोटी पेटवून मद्यसेवन केले जाते. संपूर्ण परिसरातच दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. पोलिसांची गस्त संपेपर्यंत चोरटे तेथे ठिय्या देऊन असतात. संधी मिळाल्यानंतर रेकी केलेल्या घरांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जाते. नियोजनबद्ध पद्धतीने चोरट्यांचे काम सुरू असल्याने गेल्या वर्षभरात एकही मोठा चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. दुचाकी चोरीच्याही घटना उघड झाल्या नाहीत. मंगळवारी रात्री दारव्हा मार्गावरील भारती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एमएच २९ - क्यू ३९५५ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ही दुचाकी उल्हास ठाकूर यांची असल्याचे स्पष्ट झाले. याच परिसरात दुसरी एमएच ०९ - एएक्स ५२४० क्रमांकाची दुचाकी पडलेली होती. दुचाकी चोरून ती चोरीच्या कामासाठी वापरायची व फेकून द्यायची असा नवा फंडा चोरांनी शोधला आहे. निर्जनस्थळी पोलिसांची गस्त होत नसल्याने गुन्हे उघड होताना दिसत नाहीत.

 

टॅग्स :Thiefचोर