शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत ‘मार्जीन’चा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:28 IST

कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या कापसात ‘घट’च्या नावाखाली मोठी ‘मार्जीन’ ठेवली जात आहे. त्याआड कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ सुरू आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढालग्रेडर्स-जिनिंग-प्रेसिंग मालकांचे साटेलोटे

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या कापसात ‘घट’च्या नावाखाली मोठी ‘मार्जीन’ ठेवली जात आहे. त्याआड कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ सुरू आहे. सीसीआय-पणन महासंंघाचे ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लुबाडणूक आणि शासनाची फसवणूक सुरू आहे.देशभरात सीसीआयमार्फत कापसाची खरेदी सुरू आहे. महाराष्ट्रात या खरेदीसाठी सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ सीसीआयच्या दिमतीला आहे. कापसापासून निघणाऱ्या रूईमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ‘घट’च्या माध्यमातून गैरव्यवहार होत आहेत. शासनाने शंभर किलो कापसापासून ३३ किलो ५०० ग्रॅम रूईची परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात कापसापासून सुमारे ३५ किलो रूई निघतो आहे. प्रति क्विंटल दीड किलो रूईची ‘मार्जीन’ बहुतांश ठिकाणी ठेवली जात आहे. फरदड कापसातून तर प्रति क्विंटल ३६ किलोपर्यंत रूई निघत असल्याचे सांगितले जाते. रुईमधील प्रति क्विंटल दीड किलो ‘मार्जीन’च्या माध्यमातून हा घोटाळा करण्यासाठी ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांनी साखळी बनविली आहे. त्या माध्यमातून सर्वत्र कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला जात आहे. शेतकऱ्यांचा कापूस ओला, कमी गुणवत्तेचा दाखवून त्याला कमी भाव दिले जात आहे. दुसरीकडे याच चांगल्या दर्जाच्या कापसातून अधिक रूई काढून प्रत्यक्षात शासनाला कमी दाखविली जात आहे. या माध्यमातून शासनाचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे.

महाव्यवस्थापक कार्यालयाची डोळेझाकसीसीआयचे मुख्यालय दिल्लीत असून महाराष्ट्राचे मुंबईत आहे. औरंगाबाद व अकोला येथे सीसीआयचे महाव्यवस्थापक कार्यरत आहेत. या घोटाळ्याला या कार्यालयांमधूनही दुर्लक्ष करून हातभार लावला जात आहे. कापूस खरेदी दरम्यान जिनिंगला लागणाºया आगीही संशयास्पद असून त्यातच या खरेदीतील गौडबंगालाचे भक्कम पुरावे दडलेले आहेत.महाराष्ट्रात एक कोटी गाठींंचा अंदाजयंदाच्या हंगामात देशात तीन कोटी ७० लाख रुईगाठी तयार होऊ शकतील, एवढ्या कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. त्यातील ९२ लाख ते एक कोटी १० लाख गाठी एकट्या महाराष्ट्राच्या असतील. गुजरात एक कोटी, राजस्थान-पंजाब व हरियाणा मिळून ६५ लाख गाठी, मध्यप्रदेश १८ ते २० लाख गाठी, आंध्रप्रदेश-तेलंगाणा ५५ लाख गाठी तर कर्नाटक-ओडिसा आदी राज्यांमिळून २२ ते २३ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे.गैरप्रकारात तेलंगाणा आघाडीवररूईगाठींमधील ‘मार्जीन’च्या माध्यमातून सीसीआयमध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यात तेलंगाणा राज्य सर्वात आघाडीवर आहे. त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात ग्रेडर व जिनिंग यांच्या मिलिभगतमधून हा घोटाळा सुरू आहे. सीसीआयमधील या रूई ‘मार्जीन’ घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास यातील ‘वास्तव’ पुढे येईल.

टॅग्स :cottonकापूस