शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

इम्तियाज हत्याकांडातील मुख्य मारेकरी जेरबंद, दोघे अद्यापही फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

अंजुम खान लियाकत अली खान (४४) रा. गढी वाॅर्ड याची आई व इम्तियाज खान सरदार खान याचे वडील सरदार खान हे दोघे बहीण-भाऊ आहेत. शेतीच्या व्यवहारामधून वाद झाला होता. या वादामध्ये मुख्य सूत्रधाराने सरदार खान यांच्या परिवाराला पाहून घेतो अशी धमकी दिली होती. शेतीच्या कारणावरून चार लाख रुपयांची मागणी करून इम्तियाज खानला ठार केल्याची फिर्याद सरदार खान यांनी वसंत नगर पोलीस ठाण्यात दिली.

ठळक मुद्देकळंबमधून घेतले ताब्यात : शेतीच्या पैशासाठीच गेम केल्याचे निष्पन्न, न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पाठविले कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शेतीच्या वादातून भरदिवसा एका तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले. मात्र सुपारी घेऊन हत्या करणारा मुख्य मारेकरी सय्यद असलम सय्यद सलीम रा. काळी दौलत खान ४८ तासांपासून फरार होता. त्यालाही आता पोलिसांनी कळंब तालुक्यातून ताब्यात घेतले. या प्रकरणातील एकंदर सातही आरोपींचा आता उलगडा झाला असून शेती विक्रीच्या वादातूनच इम्तियाज खानचा गेम करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अंजुम खान लियाकत अली खान (४४) रा. गढी वाॅर्ड याची आई व इम्तियाज खान सरदार खान याचे वडील सरदार खान हे दोघे बहीण-भाऊ आहेत. शेतीच्या व्यवहारामधून वाद झाला होता. या वादामध्ये मुख्य सूत्रधाराने सरदार खान यांच्या परिवाराला पाहून घेतो अशी धमकी दिली होती. शेतीच्या कारणावरून चार लाख रुपयांची मागणी करून इम्तियाज खानला ठार केल्याची फिर्याद सरदार खान यांनी वसंत नगर पोलीस ठाण्यात दिली. एका विधिसंघर्ष बालकासह सय्यद असलम सय्यद सलीम (२८) रा. काळी दौ. या दोघांनी इम्तियाज खानला ठार केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी घटनास्थळ गाठून तपासाचे चक्र फिरवले. त्यात डीबी पथकाचे प्रमुख दीपक ताठे, जलाल शेख यांनी हत्याकांडातील शेख हाफिस शेख कादर (३०) रा. मोमिनपुरा व फैजल खान मुजहिद अली खान (२७) रा. बोरी इजारा ता. महागाव दोन आरोपींसह विधिसंघर्ष बालकाला अटक केली. २६ जुलै रोजी डीबी पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, शहरचे पोलीस निरीक्षक दिनेशचन्द्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दीपक ढोमणे यांनी कळंब येथून ताब्यात घेतले. त्याला पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. 

पुसद येथील गोळीबार प्रकरणातील असे आहेत सात आरोपीइम्तियाज खान या युवकाची हत्या करण्यासाठी अंजुम खान लियाकत अली खान (४४) रा. गढी वाॅर्ड याने जेलमध्ये राहून सुपारी दिल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तर घटनेच्या दिवशी एका विधिसंघर्ष बालकासह शेख हाफिस शेख कादर रा. मोमिनपुरा, फैजल खान मुजहिद अली खान रा. बोरी इजारा या तीन आरोपींना अटक झाली. मुख्य मारेकरी सय्यद असलम सय्यद सलीम रा. काळी दौलत खान याला कळंब तालुक्यातून अटक केली. यासह कमल खान लियाकत अली खान व उसमान शमीम या सात जणांनी मिळून हत्याकांड घडविल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस