शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या शिकार प्रकरणात लोणदरीच्या पिता-पुत्राला अटक

By admin | Updated: October 25, 2014 22:47 IST

शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलात उघडकीस आलेल्या बिबट्याच्या शिकार प्रकरणात वनविभागाने पिता-पुत्राला अटक केली. शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग केल्याची कबुली

पुसद/शेंबाळपिंपरी : शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलात उघडकीस आलेल्या बिबट्याच्या शिकार प्रकरणात वनविभागाने पिता-पुत्राला अटक केली. शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग केल्याची कबुली या दोघांनी वन अधिकाऱ्यांपुढे दिली. शेकोराव नारायण इंगळे (६५) आणि गणपत शेकोराव इंगळे दोघे रा. लोणदरी ता. पुसद अशी आरोपी पिता-पुत्राची नावे आहे. इंगळे यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. त्यामुळे इंगळे संतप्त झाले. या रागाच्या भरात त्यांनी मेलेल्या शेळ्यांवर विष टाकले. सदर शेळ्या बिबट्याने पुन्हा फस्त केल्या असता त्याचा विष बाधेने मृत्यू झाला. हा प्रकार आपल्या अंगलट येईल म्हणून बिबट्याचे कातडे सोलून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली या दोघांनी वनअधिकाऱ्यांपुढे दिली. पुसद तालुक्यातील सावरगाव बंगला जंगलामध्ये वनपथक बुधवारी गस्तीवर होते. कक्ष क्र.७१४ मध्ये एक बिबट्या चामडे सोललेल्या अवस्थेत आढळून आला होता. वनविभागाने चौकशी केली असता इंगळे पिता-पुत्राने त्याची हत्या केल्याची माहिती पुढे आली. या दोघांनाही अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. वन विभागाने अवघ्या दोन दिवसात बिबट्याची शिकार करणाऱ्या पिता-पुत्राला अटक केली. आता या पिता-पुत्राकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्यांची वन कोठडी घेतली जात आहे. (वार्ताहर)