ई-पीक पाहणी अहवालावरून तालाठ्याचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:46 IST2021-09-22T04:46:49+5:302021-09-22T04:46:49+5:30

राज्य शासनाने ई-पीक पाहणी अहवालाची जबाबदारी यावर्षीपासून शेतकऱ्यावर सोपविली असून त्याची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी तलाठ्यांसोबतच इतर विभागावर सोपविण्यात ...

Lockdown movement from e-crop inspection report | ई-पीक पाहणी अहवालावरून तालाठ्याचे धरणे आंदोलन

ई-पीक पाहणी अहवालावरून तालाठ्याचे धरणे आंदोलन

राज्य शासनाने ई-पीक पाहणी अहवालाची जबाबदारी यावर्षीपासून शेतकऱ्यावर सोपविली असून त्याची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी तलाठ्यांसोबतच इतर विभागावर सोपविण्यात आली आहे. परंतु महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तलाठ्यांना ई-पीक पाहणीची वारंवार माहिती विचारून त्यांची मानसिक स्थिती बिघडवित आहे. याच विवंचनेतून आर्णी तालुक्यातील तलाठी अजय पस्तापुरे यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ व दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर तालुका शाखा मारेगावच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विदर्भ पटवारी संघाचे एस.एन. सुर्वे, डी.के. जाधव, आर.बी. श्रीपदवार, एम.डी. चिकणकर, व्ही.एच. थिटे, आर.एस. वराकर, डी.पी. वानखडे, व्ही.एम. जिवतोडे, जे.एस. कनाके, एल.डी. कुळसंगे, यू.व्ही. घोटकर, आर.डी. डवरे, ए.बी. पिंपळकर, एम.जी. बोपचे, आर.डी. कोडरकर, पी.आर. उपाध्याय, व्ही.बी. सोयाम, व्ही.आर. उमाटे, व्ही.जे. मडावी, एस.बी. राठोड, आर.एस. शिंगणे, व्ही.एल. गोरे आदी तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल उपस्थित होते.

Web Title: Lockdown movement from e-crop inspection report