शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दारू व्यावसायिकाला सव्वा लाखाने लुटले

By admin | Updated: September 3, 2014 00:04 IST

दारू व्यावसायिकाचे बोलेरो वाहन अडवून सशस्त्र टोळक्याने १ लाख २९ हजार रुपये लुटले. ही घटना तालुक्यातील फुलसावंगीलगत सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन दिवसांपूर्वी

महागाव : दारू व्यावसायिकाचे बोलेरो वाहन अडवून सशस्त्र टोळक्याने १ लाख २९ हजार रुपये लुटले. ही घटना तालुक्यातील फुलसावंगीलगत सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन दिवसांपूर्वी धनोडा येथील लुटमारीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच ही घटना घडली. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दारू व्यावसायिक वनप्रकाश गणपतराव साने (६०) रा. अहल्या रेसीडन्सी यवतमाळ आणि वाहन चालक रमेश खत्री रा. यवतमाळ हे नेहमीप्रमाणे तालुक्यातील दुकानात दारूची आॅर्डर घेण्यासाठी आले होते. बोलेरो गाडीने (एम.एच.२९-टी-४३४४) ते फुलसावंगी येथून महागावकडे निघाले. फुलसावंगीलगत चार ते पाच युवकांनी दारू पिल्याचे सोंग करून वाहन थांबविले आणि शस्त्राचा धाक दाखवून वाहनाचा ताबा घेतला. वाहनात बसून हे चारही युवक महागावच्या दिशेने निघाले. दरम्यान चिल्ली फाट्यावरून वाहन दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आले. वाहन चालक खत्री आणि साने यांच्या हाताला आणि गळ्याला दोरी आवळण्यात आली. साने यांच्या हाताला चाकूचा मार लागला तर गळ्याला दोरी आवळल्याची खूण पडली. चिल्ली मार्गावर झालेल्या झटपटीत साने यांच्याजवळील एक लाख २९ हजार रुपये असलेली बॅग घेऊन लुटारू पसार झाले. त्यानंतर जखमींनी महागाव पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी २५ ते २८ वयोगटातील होते. ते आपसात विशिष्ट भाषा बोलत असल्याचे फिर्यादीने सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान ठाणेदार अरुण आगे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपी लोकलच असल्याचा अंदाज असून सायंकाळपर्यंत त्यांना अटक करण्यात येईल, असे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन महागाव येथे दाखल झाले. (शहर प्रतिनिधी)