शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयात तिघांना जीवदान

By admin | Updated: September 12, 2016 01:44 IST

डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यात सर्पदंशाच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत.

सर्पदंश झाल्याने २४ तास झुंज : दोन डॉक्टर बनले रुग्णांसाठी देवदूतउमरखेड : डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यात सर्पदंशाच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. मात्र येथील शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाने सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान मिळत आहे. दोन दिवसापूर्वी तिघांना सर्पदंश झाला होता. या तिघांवर वेळीच योग्य उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. दोन डॉक्टर या तिघांसाठी देवदूत ठरले.उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून सर्पदंश झालेल्या रुग्णांवर खात्रीने उपचार होत आहे. त्यामुळे सर्पदंश झाला की, ग्रामीण भागातील नागरिक थेट शासकीय रुग्णालय गाठतात. त्या ठिकाणी असलेले डॉ.श्रीकांत जयस्वाल आणि शेख मोहंमद गौस हे उपलब्ध साधन सामुग्रीतून रुग्णांवर उपचार करतात. १५ दिवसापूर्वी पळशी येथील शिल्पा जोगदंडे आणि साखरा येथील सिंपल बडवे या दोघींना डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा सर्पदंशानंतर गावठी उपचार करण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात जाण्याकडे कल वाढला.अशातच दोन दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यातील हातला येथील निवृत्ती विठ्ठल ढोले या शेतकऱ्याला शेतात सर्पदंश झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर शर्तीने उपचार केले. उपचार सुरू असतानाच गाजेगाव येथील गोविंद मस्के या ३० वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याने रुग्णालयात दाखल केले. त्या पाठोपाठ चिल्ली येथील अर्जुन आत्माराम राठोड याही सर्पदंशाचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. एकाच वेळी तीन रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना मोठे परिश्रम घ्यावे लागले. सतत २४ तास या तिघांवर निगरानी ठेऊन उपचार करण्यात आले. यासाठी परिचारिका शीतल बोडगे, तेजल बोडगे, शिवा सावळे, त्रिनेत्रा स्वामी, मोगलाजी जोरगेवार यांनी सहकार्य केले. या तिघाही रुग्णांची प्रकृती आता ठणठणीत झाली आहे.सर्पदंशावर खात्रीशीर उपचार शासकीय रुग्णालयाकडे पाहण्याचा दृष्टीकोण तसा वेगळा असतो. परंतु डॉ. श्रीकांत जयस्वाल यांनी गत दोन वर्षात सर्पदंश झालेल्या शेकडो रुग्णांना जीवदान दिले. त्यामुळे उमरखेड तालुक्यात डॉ. जयस्वाल यांच्याकडे सर्पदंशावरील उपचाराचे तज्ज्ञ म्हणूनच बघितले जाते. ग्रामीण भागातील जनताही आता अंधश्रद्धेच्या आहारी न जाता थेट रुग्णालयात येतात. या ठिकाणी उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन जातात. (शहर प्रतिनिधी)