शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेपूर्वी जिल्हा परिषदेत रंगीत तालीम

By admin | Updated: September 3, 2014 23:45 IST

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असली तरी त्याची रंगीत तालीम जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही तालीम पुढची

यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असली तरी त्याची रंगीत तालीम जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही तालीम पुढची दिशा ठरविणारी राहणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आहे. आता २१ सप्टेंबरला जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी हे अध्यक्षपद राखीव आहे. समोर विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची निवडणूकही समन्वयाने घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका ताठर राहण्याची चिन्हे आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीची मदत लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणेल तसे ऐकण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे २२ तर राष्ट्रवादीचे २१ सदस्य आहेत. शिवसेनेचे दोन बंडखोर सदस्य काँग्रेसच्या तंबूत असले तरी ते त्यांच्या बाजूने मतदान करू शकणार नाही. त्यांची तशी तयारी असल्यास त्यांना सदस्य पदावर पाणी सोडण्याचीही तयारी ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी केवळ पुसद मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आता राष्ट्रवादीने आणखी दोन मतदारसंघ वाढवून मागितले आहे. यवतमाळात तर प्रचाराचा नारळही फुटला आहे. विधानसभेच्या सहा जागांवरील आपले आमदार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ हवी आहे. हेच गणित डोळ्यापुढे ठेऊन राष्ट्रवादी यावेळीही जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर दावा करू शकते. एसटी महिला संवर्गातील दोन सदस्य राष्ट्रवादीकडे आहेत. त्यातील एक महिला सदस्य ज्या नेत्याच्या समर्थनार्थ असल्याचे सांगते तो नेताच आता भाजपात गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील दुसऱ्या महिला सदस्याचा अध्यक्षपदाचा दावा सुकर झाला. मुलाचे राजकीय भवितव्य, त्यासाठी हवी असलेली आदिवासी-आंध समाजाची साथ लक्षात घेता भाऊ लालदिवा पुसदमध्ये घेऊन जातील, असे मानले जाते. काँग्रेस उपाध्यक्षपदावर दावा सांगेल. हे पद आपल्या मतदारसंघात यावे म्हणून पालकमंत्र्यांचा प्रयत्न राहू शकतो. पारव्यासारखे मध्यवर्ती केंद्र निवडून त्याचा वणी, केळापूर-आर्णी, राळेगाव, यवतमाळ या चारही मतदारसंघात काँग्रेसला फायदा व्हावा असा प्रयत्न होईल. जिल्हा परिषदेतील सभापती पद देतानाही समतोल राखला जाणार आहे. महिला बालकल्याण सभापतीच्या पदासाठी ‘डिलिंग’ची चर्चा आहे. विधानसभेचे गणित पाहता काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी हट्ट होण्याची शक्यता कमी आहे. विधानसभेच्या स्पर्धेतील नावे अध्यक्ष अथवा सभापतीच्या स्पर्धेतून बाद होईल. जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा राष्ट्रवादीची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)