शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अमोलकचंद विधी महाविद्यालयात ‘लॉ फेस्ट’

By admin | Updated: March 26, 2017 01:18 IST

येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात वार्षिक महोत्सव ‘उडाण’ उत्साहात पार पडला.

‘उडाण’ : वार्षिक महोत्सव उत्साहात, कामगार, औद्योगिक कायद्यांवर मार्गदर्शनयवतमाळ : येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात वार्षिक महोत्सव ‘उडाण’ उत्साहात पार पडला. यानिमित्त क्रीडा, संगीत, शैक्षणिक उपक्रम, मूट कोर्ट, वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात आल्या. औद्योगिक न्यायालयाचे न्या. जी.जी. हुलसुरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव पी.डी. चोपडा अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. विजेश मुणोत, लॉ फेस्टचे प्रभारी प्रा. संदीप नगराळे आदी मंचावर उपस्थित होते. कामगार आणि मालक यांच्या हिताचे कायदे असले तरी अनेक ठिकाणी कामगारांना न्याय मिळत नाही. अशाप्रसंगी कायद्याच्या विद्यार्थ्यांनी स्वस्थ न बसता जनहिताची कामे करावी, असे आवाहन न्या. हुलसुरे यांनी केले. देशातील कामगार व औद्योगिक परिस्थिती आणि कामगार व औद्योगिक कायदे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कामगार क्षेत्रात वकिली करण्याची चांगली संधी उपलब्ध असल्याचे सांगून त्यांनी पुढे चालून न्यायिक अधिकारी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चोपडा म्हणाले, डिमोनिटायझेशन झाल्यामुळे लोकांना करंसीचा अधिकार कळला. कायद्याचे विद्यार्थी म्हणून अशा बाबींचा वैधानिक अभ्यास करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशातील निवडणुकांचे बदलते स्वरूप यावरही कायद्याच्या विद्यार्थ्यांनी चिकित्सक अभ्यास करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र धात्रक यांच्या हस्ते आणि अ‍ॅड. प्रवीण हर्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. संचालन काजल मेहता, काजल बत्रा यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. अमिता मुंदडा, प्रा. योगिता बोरा, डॉ. नितीन कोथळे, अ‍ॅड. मीनाक्षी काळे, अ‍ॅड. सोनल भोयर, अ‍ॅड. अंजली दिवाकर, अ‍ॅड. रवींद्र सोनटक्के, प्रा. सुचिता ढेरे, प्रा. विजय गुर्जर, अ‍ॅड. योगेश लिंगावार, अ‍ॅड. विजया घाडगे, अ‍ॅड. नियती हिंडोचा आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)