शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ल्याचा वचपा; वणीत टोळक्याचा तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

हरिष उर्फ टिक्या संजय रायपुरे (१९) असे जखमी युवकाचे नाव असून तो दामले फैलातील रहिवासी आहे. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो काही मित्रांसोबत येथील शेवाळकर परिसरातील एका कँटिनवर चहा पित असताना काही तरुण दुचाकीवर तेथे आले. त्या तरुणांनी हरिषसोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर हातातील काठी, दगडांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर तरुणांचे टोळके तेथून पसार झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : चार महिन्यांपूर्वी झालेल्या चाकू हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तरुणांच्या एका टोळक्याने बुधवारी रात्री येथील शेवाळकर परिसरात एका तरुणावर काठ्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. प्रकृती गंभीर बनल्याने त्याला तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. हरिष उर्फ टिक्या संजय रायपुरे (१९) असे जखमी युवकाचे नाव असून तो दामले फैलातील रहिवासी आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो काही मित्रांसोबत येथील शेवाळकर परिसरातील एका कँटिनवर चहा पित असताना काही तरुण दुचाकीवर तेथे आले. त्या तरुणांनी हरिषसोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर हातातील काठी, दगडांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर तरुणांचे टोळके तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच, दामलेनगरमधील काही तरुण हरिषला घटनास्थळावरून उचलून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने गुरुवारी पहाटे ३ वाजता त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. हरिषच्या आईने याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चार तरुणांविरुद्ध भादंवि ३२४, ३४, ५०४  नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत. 

जखमी तरुण चाकूहल्ल्यातील आरोपीहल्ल्यात जखमी झालेला तरुण हा चार महिन्यांपूर्वी येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयासमोर झालेल्या चाकू हल्ल्यातील आरोपी आहे. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आला होता आणि बुधवारी रात्री त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सूड भावनेतून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी