शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी येथे किसान आझादी आंदोलन

By admin | Updated: June 2, 2017 01:45 IST

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यात गुरुवारपासून शेतकरी व विविध संघटनांनी संप पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यात गुरुवारपासून शेतकरी व विविध संघटनांनी संप पुकारला आहे. घाटंजी येथेही तहसील कार्यालयापुढे प्राऊटिस्ट व किसान आझादी आंदोलनाद्वारे उपोषण करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा, कारखानदारांप्रमाणे शेतकऱ्यांना मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार म्हणजेच शेतीला उद्योगाचा दर्जा द्या, शेतकऱ्यांच्याच मालकीचे सहकारी तत्त्वावर आधारित कारखाने सुरू करा, उत्पादन खर्च अधिक नफा आधारावर भाव लागू करा आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.आंदोलनात मधुकर निस्ताने, मोरेश्वर वातीले, हरिभाऊ पेंदोर, गजानन राऊत, अमोल बाहेकर, मोहन पवार, निखिल कचरे, अशोक जयस्वाल, गोपाल नामपेल्लीवार, परशराम सहारे, सदाशिव मडावी, मारोती मंगाम, काशीनाथ कलाणे, चिन्नप्पा आत्राम, दिलीप मडावी, सचिन कडू, संजय गजबे, उत्तम खंडारे, गौराबाई खंडारे, रमेश गावंडे आदी सहभागी झाले होते.नेर येथे कृषी केंद्र बंद, आज तहसीलवर मोर्चानेर : येथील कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने गुरुवारी बंद ठेवली. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेतमाल आणि दू शहरात आणायचे नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. आज काही प्रमाणात शेतमाल शहरात आला. मात्र शुक्रवारी शेतमाल आणि दूध शहरात येणार नाही, असे युवा संघर्ष वाहिनीचे गोपाल चव्हाण यांनी सांगितले. तसेच तुरीचे चुकारे तत्काळ मिळावे या मागणीसाठी शेतकरी शुक्रवार, २ जून रोजी तहसील कार्यालयावर धडकणार आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे सकाळी ११ वाजता मोर्चा काढला जाईल.