शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
4
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
5
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
6
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
7
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
8
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
11
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
12
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
13
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
14
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
15
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
16
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
17
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
18
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
19
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!

दारव्हा तालुक्यात ६६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तालुक्यात ६६ हजार ३०७ हेक्टर सर्वसाधारण, तर ६६ हजार १३५ हेक्टर पेरणीयोग्य शेती क्षेत्र आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारी : शेतकऱ्यांसमोर पीककर्जाची अडचण

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात यावर्षी खरिपात ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. त्यासाठी क्षी विभागाने नियोजन तयार केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, शेती साहित्य खरेदीसाठी सहकार्य, तसेच मार्गदर्शन केले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तालुक्यात ६६ हजार ३०७ हेक्टर सर्वसाधारण, तर ६६ हजार १३५ हेक्टर पेरणीयोग्य शेती क्षेत्र आहे. त्यात कापूस ३१ हजार २५० हेक्टर, ऊस १० हेक्टर, सोयाबीन २५ हजार ३०० हेक्टर, तूर आठ हजार ५०० हेक्टर, मूग ३०५ हेक्टर, उडीद ४०० हेक्टर, ज्वारी ७० हेक्टर, बाजरी आणि मका १० हेक्टर आणि भाजीपाला, फळबाग १३० हेक्टर, याप्रमाणे ६६ हजार १३५ हेक्टरवर पेºयाचा अंदाज आहे.६६ हजार हेक्टरचे क्षेत्र गृहित धरून तालुका कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभागाने बियाणे, रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत तयारी सुरू केली. यावर्षी कोरोनामुळे कृषी केंद्राची शेतकऱ्यांकडील उधारी बाकी राहिली. परिणामी बियाणे, रासायनिक खतांचे बुकींग कमी झाले. त्यामुळे वेळेत आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आला. जून महिन्याच्या सुरवातीला बियाणे, खतांच्या खरेदीला मोठी गर्दी उसळते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गोंधळ उडू नये, यासाठी अधिकारी कामी लागले आहे. मात्र शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्री, पीक कर्ज यासह अनेक प्रश्न आ वासून उभे आहे.अद्याप शेतकऱ्यांच्या घरात कापूस, तूर, चना पडून आहे. खासगी बाजारात भाव नाही. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर संथगतीने खरेदी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता नोंदणी केली. मात्र कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तूरीकरिता १00 जणांचा क्रमांक लावला जातो. तसेच कर्जमाफीची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. नियमित कर्जदारांना पीक कर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे मिळण्यास अडचणी आहे. यामुळे बियाणे, खतांच्या खरेदीसाठी वळेवर पैसे न मिळाल्यास पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी बांधव आहे.रोहिणी नक्षत्र जेमतेम आठवडाभरावर येवून ठेपले आहे. मात्र अनेक शेतकºयांकडे बियाण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहे.बियाणे, खते बांधावरकृषी केंद्रात गर्दी होऊ नये म्हणून कृषी विभागाने शेतकरी गटामार्फत बियाणे, खते थेट बांधावर पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. तसेच एका लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. येथील दोन एजंसीच्या सहकार्याने साहित्याची उचल करून बांधावर पोहोचविले. याप्रसंगी बीडीओ राजीव शिंदे, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, नालंदा भरणे, पी.पी. कांबळे, जीवन जाधव, विजयकांत जैवळ, संदीप चव्हाण, प्रेमसिंग राठोड, सुरेश धार्मिक, गणेश अग्रवाल उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज