कृषी प्रक्रिया उद्योगातूनच रोजगार निर्मिती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:07+5:30

प्रास्ताविक आदित्य मानकर, संचालन ज्योत्स्ना पिंपळकर, तर आभार राजेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अक्षय मुदगलवार, प्रतीक्षा वानखडे, भाग्यश्री भोरे, योगेश सोळंके, शिवम वानखडे, वैशाली मेश्राम, तरुण जाधव यांनी पुढाकार घेतला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय भारती यांनी अर्थशास्त्र मंडळाचे कौतुक केले.

Jobs can be created from the agricultural processing industry | कृषी प्रक्रिया उद्योगातूनच रोजगार निर्मिती शक्य

कृषी प्रक्रिया उद्योगातूनच रोजगार निर्मिती शक्य

ठळक मुद्देआर्णीत परिसंवाद : विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचा सुवर्ण महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील राजकमलजी भारती महाविद्यालयात ‘ग्रामीण बेकारी समस्या व उपाय’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्यात कृषी प्रक्रिया उद्योगातूनच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती शक्य असल्याचा सूर वक्त्यांनी व्यक्त केला.
बीजभाषक डॉ.रमेश बिडवाई यांनी ग्रामीण बेकारीचे विदारक चित्र स्पष्ट करून कृषी प्रक्रिया उद्योगातूनच ग्रामीण रोजगारनिर्मिती होईल, असे प्रतिपादन केले.
परिसंवादात प्राचार्य जी.एम. अग्रवाल, प्रा.आनंद वाघमारे, प्रा.निवृत्ती पिस्तुलकर, डॉ.शशिकांत वानखडे, डॉ.राजेंद्र तातेड, प्रा.विनित माहुरे, डॉ.मनोज काकपूरे आदींनी ग्रामीण रोजगाराभिमुख कृषी धोरणाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रामाणिक अंमलबजावणीची गरज व्यक्त केली.
प्रास्ताविक आदित्य मानकर, संचालन ज्योत्स्ना पिंपळकर, तर आभार राजेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अक्षय मुदगलवार, प्रतीक्षा वानखडे, भाग्यश्री भोरे, योगेश सोळंके, शिवम वानखडे, वैशाली मेश्राम, तरुण जाधव यांनी पुढाकार घेतला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय भारती यांनी अर्थशास्त्र मंडळाचे कौतुक केले.

Web Title: Jobs can be created from the agricultural processing industry

टॅग्स :agricultureशेती