शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांचा दिल्लीत गौरव

By admin | Updated: October 14, 2016 03:06 IST

दिल्ली येथे झालेल्या आयईटीई-एटीसी-१६ या वार्षिक तांत्रिक संमेलनात स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले.

यवतमाळ : दिल्ली येथे झालेल्या आयईटीई-एटीसी-१६ या वार्षिक तांत्रिक संमेलनात स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या सुखदा धर्माधिकारी व मयुरी भगत यांचा यामध्ये समावेश आहे. आयईटीई यवतमाळ सब सेंटर आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल टेक्निकल पेपर कॉन्टेस्ट-२०१६ चे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. यामध्ये सदर विद्यार्थिनींनी ‘झिग्बी टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इटस् अप्लिकेशन इन आॅटोमॅटीक वॉटर टँक कंट्रोलिंग सिस्टीम फॉर प्रेस टँक्स’ या शोधनिबंधाचे सादरीकरण करून द्वितीय पारितोषिक पटकावले. नवी दिल्लीतील संमेलनात या विजेत्याचा आयईटीईच्या अध्यक्ष स्मृती डागुर यांच्या हस्ते रोख पोरितोषिक व गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर आयईटीईचे नवनियुक्त अध्यक्ष लेप्टनंट जनरल डॉ.चंदेले, महासचिव मेजर जनरल पी.के. जगिया, तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ.के.टी.व्ही. रेड्डी, पश्चिम विभाग को-आॅर्डीनेटर डॉ.जे.डब्ल्यू. बाकल, डॉ.गणशेखर राव आदी उपस्थित होते. या सोहळ्याला भारतातील विविध आयईटीई केंद्राचे पदाधिकारी, संशोधक, विशेष निमंत्रित आणि आयईटीईचे विद्यार्थी उपस्थित होते. नॅशनल टेक्निकल पेपर कॉन्टेस्ट हा आयईटीई नवी दिल्लीचा वार्षिक कार्यक्रम आहे. भारतातील ६६ आयईटीई केंद्रापैकी यावर्षी आयईटीई यवतमाळ सब सेंटर, जेडीआयईटी यवतमाळ येथे आयोजन झाले. राष्ट्रीय पातळीवर आयोजित या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातील सुमारे ४० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी १३७ शोधनिबंध नोंदवून सहभाग घेतला. यामध्ये प्रथम पारितोषिक आयआयआयटी अलाहाबादची निकिता अग्रवाल, जेडीआयईटी यवतमाळच्या सुखदा धर्माधिकारी व मयुरी भगत यांनी द्वितीय पारितोषिक तर तृतीय पारितोषिक शेगावच्या माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अश्विनी बी. माळी, अश्विनी आर. पाटील यांना घोषित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे अध्यक्ष डॉ.संजय गुल्हाने यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)