शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर चक्रभुगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. आता कसे तरी पीक शेतात दिसू लागले असताना

यवतमाळ : यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. आता कसे तरी पीक शेतात दिसू लागले असताना सोयाबीनवर चक्रभुंगा व कीडीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी लक्षणीय घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतीची अत्यंत वाईट अवस्था आहे. मागील वर्षी खरीफाच्या हंगामात अतिवृष्टी व नंतर रबीच्या हंगामात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागले नाही. यासर्व संकटातून सावरत नवीन वर्षाच्या खरीपासाठी शेतकऱ्याने कंबर कसली होती. परंतु पावसाने पावसाळा सुरू होऊनसुद्धा जवळपास दोन ते अडीच महिने दडी मारली. त्यामुळे पेरण्या होऊ शकल्या नाही. ज्या काही थोड्याफार पेरण्या आटोपल्या होत्या त्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. या सर्व परिस्थितीत शेतकरी त्याच्या अंगावर असलेले कर्ज फेडू शकला नाही. त्यामुळे बँकांनी पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांना पुन्हा खासगी सावकाराच्या दारावर जावे लागले. होते नव्हते ते दागिने विकूण पुन्हा एकदा खरीपाची पेरणी केली. मुळात पावसाच्या लहरीपणामुळे पेरणीचा विलंब झाला. त्यातच आता कशीबशी पिके शेतात डोलायला लागली असताना विविध कीडींचा प्रादुर्भाव पिकांवर दिसून येत आहे. येत्या काळात हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे व त्यानुसार उपाययोजना कराव्यात. जेणे करून सोयाबीनचे पीक वाचविण्यात शेतकऱ्यांना यश येईल. सायोबीन पिकांवरील चक्रभुंगा ही कीड मुख्यत: खोडाचा भाग पोखरते. याचा प्रादुर्भाव पिकांच्या सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग सुकतो. पिके साधारणत: दीड महिन्यांची झाल्यावर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळत नाही. परंतु ज्या झाडावर कीडींचा प्रादुर्भाव झाला अशा झाड्यांना शेंगा कमी प्रमाणात लागतात. परिणामी एकूण उत्पन्नात चांगलीच घट होेते. पिकांमध्ये कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास चक्रकाप तयार केलेली फांदी देठापासून काढून टाकावी अशा प्रकारच्या उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे कृषी विभगाने म्हटले आहे.सोबतच कीड व्यवस्थापनासाठी आवश्यक ती औषधी फवारणी करने गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. आणि वेळीच त्याची अंमलबाजावणी करून कीडीची रोकथाम करावी. असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)