शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोस्वीचमुळे रोहित्र जळण्याच्या घटना

By admin | Updated: October 22, 2016 01:44 IST

महावितरणकडून पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या येण्याचा व जाण्याचा निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते.

महावितरणचा दावा : अखंडित वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहनयवतमाळ : महावितरणकडून पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या येण्याचा व जाण्याचा निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण कृषिपंपांनाच आॅटो स्वीच लावतात. परंतु या यंत्रणेमुळे रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा महावितरणने केला आहे. अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅटो स्वीचचा वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत एक लाखाच्या घरात कृषिपंपधारक शेतकरी आहे. तर राज्यात सुमारे ३९ लाख कृषिपंपधारक आहेत. महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा देण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जावून कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपांनाच आॅटो स्वीच लावले आहे. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. ही बाब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना आॅटो स्वीच लावू नये, तसेच काही शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास काढून टाकण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. यामुळे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी होईल व शेतकऱ्यांना योग्य दाबाचा अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल आणि शेतकऱ्यांना सोयीचे जाईल, असेही वीज कंपनीने म्हटले आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांना नियमितपणे पाणी देता येईल, असे आवाहन वीज कंपनीने केले आहे. (प्रतिनिधी)वीज बचतीसाठी कपॅसिटर बसवावेकृषिपंपधारक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला कपॅसिटर बसवावे. यामुळे वीज बचत होवून पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो. तसेच कृषिपंप जळण्याचे प्रमाणही कमी होते. रोहित्रांवरील भार ३० टक्क्याने कमी होवून रोहित्र जळण्याचेही प्रमाण कमी होते. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कपॅसिटरचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.