शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बेड्या घालून द्यावी लागली आईच्या चितेला भडाग्नी

By admin | Updated: October 27, 2014 22:44 IST

प्रेमप्रकरणात उद्ध्वस्त होऊन तुरुंगात गेलेल्या एका तरुणावर हातात बेड्या घालून आईच्या चितेला भडाग्नी देण्याची वेळ आली. नेर शहरात रविवारी या मुलाने आईवर अंत्यसंस्कार केले.

प्रेमप्रकरणातून तुरुंगात : अखेरच्या भेटीची इच्छाही अपूर्ण, एका चुकीने आयुष्य झाले उद्ध्वस्तनेर : प्रेमप्रकरणात उद्ध्वस्त होऊन तुरुंगात गेलेल्या एका तरुणावर हातात बेड्या घालून आईच्या चितेला भडाग्नी देण्याची वेळ आली. नेर शहरात रविवारी या मुलाने आईवर अंत्यसंस्कार केले. मात्र अखेरच्या भेटीची आईची इच्छा मात्र त्याला पूर्ण करता आली नाही. नेर येथील युवकाचे शेजारील एका तरुणीवर प्रेम जडले. दोघांनीही सोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेतल्या. आपल्या प्रेमाला विरोध होईल. कुटुंबीय मान्य करणार नाही म्हणून दोघेही घरुन पळून गेले. मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या या तरुणाला आपली प्रेयसी अल्पवयीन आहे, याचा विसर पडला. मुलीकडील मंडळींनी या दोघांचा शोध सुरू केला. दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या दोघांनाही जेरबंद केले. तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. सध्या तो यवतमाळच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. मुलगा तुरुंगात गेल्यावर त्याचा संपूर्ण परिवार हतबल झाला. एकुलत्या एक मुलाचे असे झाल्याने आईने हाय खाल्ली. रविवारी स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका झाला. त्यात त्या तरुणाची आई ६० टक्के जळाली. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या भेटीसाठी ती काकुळतीने विनंती करीत होती. मात्र मुलगा तुरुंगात असल्याने तिच्या वेदना श्वासात गुदमरल्या. तिने अखेरचा श्वास घेतला. मातेच्या चितेला भडाग्नी देण्यासाठी मुलाला तुरुंगातून सूट देण्यात आली. एखाद्या चित्रपटात शोभावे असे तो चार पोलिसांच्या सोबत गावात आला. हातात हातकड्या बांधूनच आईचे अंत्यदर्शन घेतले आणि हातकडी घालूनच आईच्या चितेला भडाग्नी दिली. हा प्रसंग पाहनू अनेक जण हेलावले. क्षणिक सुखासाठी माणसाचे जीवन कसे उद्ध्वस्त होते याचा प्रत्यय नेरच्या स्मशानभूमीत अनेकांनी अनुभवला. (तालुका प्रतिनिधी)