शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहराला दररोज पाण्यासाठी तातडीने निधी

By admin | Updated: July 27, 2014 00:19 IST

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहराला दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे सांगून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेला निधी तातडीने दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

यवतमाळ : जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहराला दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे सांगून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेला निधी तातडीने दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.ज्या भागात फ्लोराईडयुक्त पाणी आहे तेथे पाणीपुरवठा योजना राबविताना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. गेल्या वर्षात विकास आराखड्यास चांगली वाढ देण्यात आली आहे. दिलेला निधी अखर्चित राहणार नाही, यासाठी यंत्रणेने नियोजन करून काम करावे, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांचे काम अर्धवट झाले. बांधकामासाठी शासनाने मुदतवाढ दिल्यास ही कामे तातडीने पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे मुदतवाढीसह सात कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. पवार यांनी या वेळी दिली. पुराचा फटका बसत असलेल्या गावात उपययोजनांसाठी पूरनियंत्रण सर्व्हे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अतिवृष्टीत शेतात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमीतकमी ७०० रुपये देण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, अतिवृष्टीग्रस्तांना निधी वाटप आदी बाबींची माहिती सादर केली. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार वामनराव कासावार, संजय राठोड, संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष ययाती नाईक, नगराध्यक्ष सुभाष राय, आयुक्त डी.आर. बन्सोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर जिल्हाधिकारी ज्ञानेश भट, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)