शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या महसुलासाठी दारूबंदीकडे डोळेझाक

By admin | Updated: October 10, 2016 01:59 IST

दारुविक्रीतून सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. त्यामुळेच दारुबंदीकडे डोळझाक केली जाते. बिहारसारखे

दारुविक्रीतून सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. त्यामुळेच दारुबंदीकडे डोळझाक केली जाते. बिहारसारखे राज्य दारुबंदीचा निर्णय घेऊ शकते, तर इतर राज्य का नाही? नशेच्या मार्गातून कोट्यवधी रुपये मिळत असले तरी लाखो भारतीयांची पिढी बरबाद होत आहे. पैसा महत्त्वाचा की जीव याचा निर्णय सरकारने घ्यावा. म्हणूनच सर्व राज्यांना आमचे आवाहन आहे, ‘शराब का व्यापार, छोड दे सरकार’, अशा सडेतोड शब्दात नर्मदा बचाव आंदोलनाच्या मुख्य संयोजक मेधा पाटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नशामुक्त भारत यात्रेदरम्यान कळंब येथे आल्या असता रविवारी मेधा पाटकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत विविध विषयांवर रोखठोक भूमिका मांडली. भूमिअधिग्रहणाचा कायदा नियमबाह्यच नव्हेतर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मारक होता. त्याविरुद्ध आम्ही एकजुटीने उभे राहिलो. त्यामुळेच मोदी सरकारला हा कायदा रद्द करावा लागला. याचा फायदा शेतकरी व शेतमजुरांना मिळणार आहे. पाणी नियोजन, ऊर्जा नियोजन, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण, शेती आदी विषयांच्या विकासात्मक कामात नैसर्गिक तत्त्वे पाळली गेली पाहीजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासन दारुवाल्यांशी मिळालेले आहे. राजकीय नेत्यांचेच दारुचे कारखाने आहे. अनेक ठिकाणी त्यांची भागीदारी आहे. त्यामुळे हे सर्व धंदे बंद करण्यासाठी जनरेटा महत्त्वाचा आहे. दारुचा सर्वात जास्त फटका महिलांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे महिलाशक्तीने आता पुढे आले पाहिजे. गावा-गावातून महिला दारुबंदीसाठी पुढे येत असताना महाराष्ट्र सरकार दाद देत नाही. पारोमिता गोस्वामी, अभय बंग, राणी बंग, महेश पवार, भाई रजनिकांत, शुभदा देशमुख, सतीश गोगुलवार आदीसह अनेक जण दारुबंदीसाठी आंदोलन करीत आहे. परंतु, आता हे आंदोलन अधिक तीव्र केले पाहिजे. यासाठी गांधीवादी आणि मार्क्सवादी यांनी एकत्र आले पाहिजे. वर्ध्यात गांधीजींना स्मरून दारुबंदी झाली. परंतु, पवनार येथून विनोबांच्या आश्रमाजवळूनच दारुविक्री केली जाते. हे सरकारचे मोठे अपयश आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी सरकारला आवाहन केले जाणार आहे. यापुढे आव्हान देण्याची तयारीही आम्ही करीत आहो. नर्मदेच्या लढ्याला आता ३१ वर्षे पूर्ण झाली. नर्मदेचा लढा हा विस्थापितांच्या हक्कासाठी आहे. सरदार सरोवराचे दररोज ३० लाख लिटर पाणी केंद्र सरकार कोकाकोला कंपनीला देते. हेच पाणी उद्योगाला देण्याचा घाट घातला जात आहे. तीन शहरांना भरपूर पाणी दिले. परंतु ८ हजार २०० गावे तहानलेली ठेवली. याविरोधात लढा उभारण्याची तयारी सुरु आहे. येत्या २१, २२ आॅक्टोबरला मुंबईमध्ये राष्ट्रीय परिषद होत आहे. परिषदेला अनेक मुख्यमंत्री व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, जनआंदोलनाचे नेते एकत्र येत आहे. तेथूनच औद्योगिकीकरण व जागतिकीकरणाच्या विरोधात देशापुढे एक नवा अजेंडा ठेवला जाईल, अशी माहिती मेधा पाटकर यांनी दिली. १६ राज्यांतील संघटना एकवटल्या दारूविक्रीतून महाराष्ट्र २३ हजार कोटी, आंध्र प्रदेश ५० हजार कोटी, तेलंगणा १४ हजार कोटी, तमीळनाडू २६ हजार कोटी रुपये कमविते. इतर राज्यही यात मागे नाहीत. चिंतेची बाब म्हणजे, राज्य सरकारे ही आकडेवारी गर्वाने सांगतात. या विरोधात आता १६ राज्यांतील सामाजिक संघटना एकत्र आल्यात. यासाठी १ जुलै रोजी दिल्ली येथे विचारमंथन करण्यात आले. त्या ठिकाणी नशामुक्त भारत आंदोलनाची स्थापना झाली. आता भारतभर जनजागृती केली जात आहे. ही यात्रा त्याचाच एक भाग असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या.