शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

11 हजार भिक्षेकऱ्यांना आधार कार्डविना लस मिळणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:30 IST

 लसीकरण करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांमध्ये आधार कार्ड अथवा पॅन कार्ड सक्तीचे आहे.  आधार कार्ड नसेल तर साॅफ्टवेअरची यंत्रणा असे नाव साॅफ्टवेअरमध्ये स्वीकारत नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांना लस देता येत नाही.  प्रत्येक गोष्टीचा हिशेब सादर करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याला मिळालेली लस किती जणांना दिली. याचा हिशेब सादर करताना आधार नंबर गरजेचा आहे.

ठळक मुद्देबेघरांपुढेही निवाऱ्याचा प्रश्न; कोरोनाच्या लसीबाबत अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटावर्कयवतमाळ : देशातील प्रत्येक नागरिक माैल्यवान आहे. या नागरिकांना वाचविण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. देशपातळीवर ही मोहीम राबविली जात आहे. यासंदर्भात प्रत्येकाला लस मिळावी, त्यात कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एकूण लोकसंख्येच्या ९९ टक्के आधार कार्ड निघाल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी भिक्षेकरी, बेघर नागरिक आणि इतर काही मंडळी यांच्याकडे आजही आधार कार्ड नाही. आता लसीकरण करताना आधार कार्ड नसेल तर अशा मंडळींना कोरोनाच्या लसीला मुकावे लागणार आहे. कोरोनाला हद्दपार करताना प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टीने भक्कम असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत काही जण सुटले,   तर कोरोनाचा धोका कायम राहणार आहे.

बेवारस नागरिकांची सर्वाधिक संख्या यवतमाळ शहरात जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बेवारस नागरिकांची संख्या यवतमाळमध्ये आहे. याठिकाणी मंदिर, मशीद, बसस्थानक, पारधी बेडा आणि गावाबाहेर ही मंडळी मोठ्या संख्येने आहे. याशिवाय जिल्ह्यातील पुसद, नेर, दिग्रस, उमरखेड, वणी या शहरांमध्येही बेवारस नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.बाहेरगावावरून कामानिमित्त येणारे अनेक नागरिक शहराबाहेर झोपड्या करून राहत आहेत. यातील बहुतांश नागरिकांकडे आधार कार्डसारखे दस्तऐवज नाही. अशा नागरिकांच्या नोंदीचा प्रश्न आहे.

आधार कार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार लसीकरण करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांमध्ये आधार कार्ड अथवा पॅन कार्ड सक्तीचे आहे. आधार कार्ड नसेल तर साॅफ्टवेअरची यंत्रणा असे नाव साॅफ्टवेअरमध्ये स्वीकारत नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांना लस देता येत नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशेब सादर करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याला मिळालेली लस किती जणांना दिली. याचा हिशेब सादर करताना आधार नंबर गरजेचा आहे.

 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस