शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले. जिल्ह्यातील भाजीपाल्यांना मिळणारे दर लक्षात घेता इतर जिल्ह्यासह इतर राज्यांनीही जिल्ह्याकडे नजर वळविली आहे.

ठळक मुद्देपरजिल्ह्यासह परराज्यातूनही आवक : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही दरवाढीचा फटका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे भाजीपाला क्षेत्रात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. याचा फटका गृहिणी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांचे दर वधारतात. यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांनी पाच हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली. मार्चमध्ये कोरोनाचा आजार बळावला आणि तेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झाले. यामुळे भाजीपाल्याची विक्रीच शेतकऱ्यांना करता आली नाही. लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल झाला. हे नुकसान शेतकऱ्यांना कधीही भरुन निघणार नाही, असेच होते. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र घटविले. आता ८०० ते हजार एकरवर भाजीपाला शिल्लक राहिला आहे. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर कडाडले. जिल्ह्यातील भाजीपाल्यांना मिळणारे दर लक्षात घेता इतर जिल्ह्यासह इतर राज्यांनीही जिल्ह्याकडे नजर वळविली आहे. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश शिवाय नाशिक, पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, संगमनेर या ठिकाणावरूनही भाजीपाल्याची आवक जिल्ह्याच्या बाजारपेठेत झाली आहे. याचा फायदा इतर राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे.हॉटेल व्यवसायाचा भेंडीवर परिणामभेंडी सर्वाधिक आवडीची भाजी म्हणून विकली जाते. हॉटेलमध्ये याचा सर्वाधिक वापर होतो. हॉटेल व्यवसाय बंद आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेली भेंडी खरेदी करणारे ग्राहक घटले आहे. परिणामी भेंडीचे दर भाजीबाजारात जैसे थे असेच आहे. जुलै महिन्यात पावसाने भेंडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतरही भेंडीच्या दरात कुठलीही सुधारणा झाली नाही. सध्या भेंडीचे दर ४० रुपये किलो आहे.या कारणामुळे भाज्यांचे भाव वाढलेभाजीपाल्याचे क्षेत्र जिल्ह्यात कमी झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांची लागवड केली. आता भाजीपाल्याचे क्षेत्र खरिपाखाली आल्यामुळे मोजक्याच क्षेत्रावर भाजीपाला लागवड शिल्लक राहिली आहे. परिणामी भाज्यांचे दर वधारले.कोरोना कधीपर्यंत कायम राहील याचा नेम नाही. यामुळे भाजीपाला उत्पादकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी भाजीपाल्यांची वाडी रिकामी केली आहे. या ठिकाणी मूग आणि उडदाची लागवड केली आहे. यातून डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढणार आहे.मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. आठवडी बाजार बंद आहेत. अशा परिस्थितीत गरज पूर्ण करण्यासाठी परराज्यातून भाजीपाल्याची आवक करण्यात येत आहे. याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे.

टॅग्स :vegetableभाज्या