शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांच्या उपचारासाठी रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

बऱ्याचदा वन्यजीव विहिरीत पडतात, फाशात अडकतात, अपघातात जखमी होतात अशा वन्यजीवांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज अशी रुग्णवाहिका व रॅपीड रेस्क्यू टीम तयार केली जाणार आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार करता येणार आहे, जेणेकरून वन्यजीवांना अपघातातून वाचण्यास मदत होईल, हा या मागचा उद्देश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याला संपन्न अशी वनसंपदा लाभलेली आहे. सर्वच भागात वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. अलीकडे तर वाघ, बिबट या सारखे दुर्मीळ प्राणीही सहज दिसत आहे. यावरून जंगलातील वन्यजीवांची संख्या वाढत असल्याचे दिसते. हे वन्यजीव कुठल्या कारणाने जखमी झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी व्यवस्थाच नव्हती. आता वन्यजीवांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारले जाणार आहे. विविध महामार्गांवर वाहनाच्या धडकेने वन्यजीव जखमी होतात. बऱ्याचदा तारांचे कुंपण, झुंजीत वन्यजीव जखमी होते. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाकडे स्वतंत्र यंत्रणाच नव्हती. जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून, या वन्यजीवांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवावे लागत होते. काही वर्षांपूर्वी अमोलकचंद महाविद्यालयाच्या मागील परिसरात वसंत उद्यानासमोर एक केंद्र उपलब्ध होते.  त्या ठिकाणी जखमी वन्यप्राण्यांना देखभालीसाठी ठेवले जात होते, नंतर हे केंद्र बंद झाले. तेव्हापासून वनविभागाची मोठी अडचण झाली आहे. जखमी वन्यजीवाला वैद्यकीय उपचारासोबतच दैनंदिन देखरेख आवश्यक असते. उपचार केल्यानंतर थेट त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडणे धोक्याचे ठरते. त्यामुळेच यवतमाळ व वाशिम या दोन उपविभागांत वन्यजीवांसाठी रुग्णालय तयार केले जाणार आहे. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय तज्ज्ञांमार्फत जखमी प्राण्यांवर उपचार करण्यात येईल, तसेच त्यांना तंदुरुस्त होईपर्यंत निगराणीत ठेवले जाणार आहे. यवतमाळातील जाम रोडवरील ऑक्सिजन पार्क परिसरात हे उपचार केंद्र उभारता येते का, याची चाचपणी केली जात आहे. नंतर तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 

 वन्यजीवांसाठी रुग्णवाहिका- बऱ्याचदा वन्यजीव विहिरीत पडतात, फाशात अडकतात, अपघातात जखमी होतात अशा वन्यजीवांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज अशी रुग्णवाहिका व रॅपीड रेस्क्यू टीम तयार केली जाणार आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार करता येणार आहे, जेणेकरून वन्यजीवांना अपघातातून वाचण्यास मदत होईल, हा या मागचा उद्देश आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग